Skip to main content

लेख

धूसर जगात.....!

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 02/12/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
धुकं फार पडलयं. झाडांचे शेंडे त्यातून वरती डोकावतायत. गर्द हिरव्या डोंगरावर हे पांढरट धुकं अधुन मधून पसरलेलं. मी डोंगराच्या माथ्यावर ऊभा आहे. अगदी ऊंच. खाली पसरत गेलेल्या दऱ्याखोऱ्या मी निरखून बघतो. लांबवर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातील धबधबे पाहून मी हरवून जातो. एखादी वाऱ्याची झुळुक अंगावर शहारे ऊमटवून जाते.हा डोंगर चढताना माझी फारशी दमछाम झालेली नसते. या आल्हादायक वातावरणात मी एका दगडामागे लपतो. आणि दूर एखाद्या पायथ्याशी झाडांची हालचाल नजरेने टिपतो. माझ्या हातात रायफल असते. आणि तिचा निशाणा त्या हालचालींवर असतो. एक डोळा बारीक करुन मी नेम धरतो. मला फारसं काही दिसत नाही.

बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 02/12/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.

जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 02/12/2015 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
१९६५ चा सप्टेंबर महिना... लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती. प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर! सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती! विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला! सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या!

फणस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/12/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
. “फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….” कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्‍या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल

निसर्ग सहवास

लेखक जागु यांनी सोमवार, 30/11/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
उरण मधील एका वाडीमध्ये माझे बालपण गेले. वाडीमध्ये शेतजमीन आणि मळा (भाजी पाला लागवडीसाठीची जागा). वाडीतील शेते पावसाळ्यात तांदळाच्या शेतीने हिरवीगार तर हिवाळ्यात भाज्यांनी सदा बहरलेली असायची. वाडीच्या आत वाडीच्या जीवनचक्राला जीवन देणारी भव्य जिन्यांची विहीर. वाडीच्या कुंपणाला तारेला लागून कुठे करवंदाची जाळी तर कुठे पांगारा, भेंड, खरवत, शाल्मली (काटेसावर) ची झाडे. वाडीमध्ये शेताच्या बांधावर व इतर जागी आंबा, चिंच, बोरे, जांभूळ, अस्वन अशी ऋतूनुसार रानमेव्याने लगडणारी वृक्षसंपदा. फुलपाखरे, चतुर, टाचण्या, रानफुले, रानमेवा, विहीर, झाडे, शेती, मळे हे माझे बालपणीचे जीवलग निसर्ग सवंगडी.

एखादा स्पर्श

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/11/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
” मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.” अलीकडे माझ्या पहाण्यात आलं आहे की,बॉलीवूडच्या विश्वात आणि टिव्हीवरच्या हिंदी सिरयल्समधे प्रथम भेटीत कोण कुणाला जवळ घेत असतो-हग देत असतो-कोण कुणाच्या गालानी गालाला स्पर्श करीत असतो.किंवा पाठ थोपटीत असतो.हे अलीकडे बरचसं आपण पाश्चात्यांकडून उचलून घेतलं आहे असं मला वाटतं. आपल्या रीतीत पुर्वापार आपण प्रथम भेटीत आपलेच हात जोडून नमस्कार करतो.मोठ्यांना वाकून पायापडतो.पण स्पर्श असा होत नाही. अप्पा कर्णीकांच्या घरात केव्हाही जा,घरात वयाने लहान मुलं असतील ती वाकून तुमच्या पायाला स्पर्श करून ज

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 24/11/2015 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ चा फेब्रुवारी महिना... गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता.. नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता! चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती.. काय करावं? या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं? आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं? आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली! एकदा! फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही! ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही! येस!

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

क्रिकेट मधली घराणेशाही!

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 21/11/2015 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
जंटलमन्स गेम - ३ - इंडेक्स फिंगर या माझ्या लेखावर आलेल्या एका कॉमेंटमध्ये आमच्या बोकोबांनी इंग्लिश टेस्ट क्रिकेटर आणि अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता का असा प्रश्नं केला होता. अनेक वर्ष माझीही समजूत रिचर्ड हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता अशीच होती, पण सहज म्हणून तपासल्यावर प्रत्यक्षात दोघांचा काहिही संबंध नसल्याचं आढळून आलं! त्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीवर थोडाफार प्रकाश टाकावा असा विचार मनात आला. घराणेशाही हा विशेषतः भारतीय राजकारणातला अगणित वेळा चर्चा झालेला विषय!