Skip to main content

लेख

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

शरद मामा

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 11/11/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
शरद मामा शरद मामा माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे.

टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 11/11/2015 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
१९५१ सालचा डिसेंबर महिना... मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारत - इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती... दिल्लीला झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली असली तरी पहिल्या इनिंग्जमध्ये सदु शिंदेंच्या (शरद पवारांचे सासरे!) लेगस्पिनने इंग्लंडला २०३ मध्ये गुंडाळलं होतं. विजय मर्चंट (१५४) आणि विजय हजारे (१६४*) यांच्या २११ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर (आठवा अमिताभचा नमक हलाल मधला अजरामर सीन!) भारताने ४१८ / ६ वर इनिंग्ज डिक्लेअर केली होती.

बापट काका

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले...

प्रिय पु ल काका

लेखक शीतल जोशी यांनी रविवार, 08/11/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पु ल काका , लहानपणी ,मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी झाले , गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता , तो होता तुमचा … पुलकीत आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले . आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते .

अळुची भाजी खाऊन वाचलो तर…...

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 08/11/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या पाटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.

पहिली आठवण अन पहिला क्षण

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 05/11/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली आठवण अन पहिला क्षण पहिला दिवस, प्रत्येक वेळी हा पहिला दिवस फार संस्मरणीय असतो ना!!! शाळेतला पहिला दिवस तसा नाही आठवणार आता, पण थोडे काही दिवस आठवत आहेत, अगदी सुरवातीला जेव्हा लहान गट मध्ये गेले तेव्हाचा युनिफोर्म चा रंग आठवतो आहे, पण गम्मत अशी कि लहानगट मधेच शाळा बदलेली आणि सांगलीला नव्या शाळेत घातले त्यावेळचे म्हणजे म्हणजे कोणत्या रंगाची waterbag होती आणि कंपास box हे मात्र आठवतंय.

'माळा'

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
हो...

गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 03/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार” सुलभा मला म्हणाली. सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची. “वाः! काय सुंदर झालेत अनारसे” असं मी म्हटल्यावर, “मोठे कष्ट पडतात बाबा!

चित्रा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/11/2015 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीच पहिलं बाळंतपण! आपल्याच घरी व्हावं म्हणून आईने खूप प्रयत्न केलेले पण लेकीच्या सासरच्यांनी, 'कशाला त्या गावखेड्यात? तित काय येळला सोयी-सुविधा हायेत, का रातीअंधारचं गाडी-घोडा आहे? शिवाय एकली आई आन म्हातारी आज्जी. त्यांच त्यान्ला तरी उरकतयं का ह्ये परपंचाच ऱ्हाटगाडग?' अशा उलटतपासण्या करून बाळंतपण कुठे व्हाव हा विषय संपवून टाकला! मग नातीने चिमुकले पाऊल सा-यांच्याच जगात ठेवल्यावर लेकीच्या आग्रहाखातर आठ-पंधरा दिवसांसाठी आई गावातल्या वावरातली विळा-खुरपी तिथेच सोडून शहरातल्या इमारतींच्या जंगलात आली. पहिल्यांदाच एकटी आलेली!