Skip to main content

लेख

कोण ?

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 08/01/2016 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळी कडे मिट्ट काळोख होता. दिनु आपल्याच नादात शेताला पाणी भरत होता .रात्रीचे ११ :४७ झाले होते .गावाकडे लाईट ऐन वेळी येते हे तर सर्वांना माहीतच आहे . दिनु ने खिशातुन माचिस काढली आणि जमलेल्या काड्या काटक्या आणि गवत पेटवले . , जानेवारीचा महिना होता त्यात रातची थंडी पण भयंकरच होती. वाफ्यातुन पाणी संथ गतीने वाहत होते. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. दिनु तसा धीट मुलगा होता . पण कधी कधी त्याची पण.... ची. तो आजही पाणी भरायला येत नव्हता पण बापाने दोन कानाखाली वाजवल्या म्हणुन आला होता.

कमलचा आनंदाचा क्षण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 08/01/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.” विनायकची अशीच एक आठवण, "ते जून महिन्याचे दिवस होते.उन्हाळा प्रचंड भासत होता.पाऊसही पडेल अशी शक्यता वाटत होती.

टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 07/01/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात. या दोन्हींकडे तटस्थपणे बघितलं की आपल्याला कळतं की अधिक फायदेशीर काय आहे. तरीही व्यक्तीची इच्छा, शारिरिक कुवत, असलेला वेळ, इत्यादी गोष्टीही बघाव्या लागतात. याची सुरुवात कधी, कशी होते ते बघू. उमेदीच्या वयात म्हणजे २० ते ३० वर्षे या काळात बहुतेक जण व्यायाम, आरोग्य या विषयाकडे लक्ष देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो, पण देतात साधारणपणे.

घमघम घमघम

लेखक मीन यांनी गुरुवार, 07/01/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
येश्या आजपन त्या मॉलच्या फाटकासमोर हुबा ह्रायला. गेले कितीतरी दिस त्यो रोज असा थितं थांबयचा.पन आजचा दिस येगळा व्हता. त्याच्या छातीतले ठोके व्हाडले हुते. हातपाय थरथरू लागले हुते. येश्या एका झोपडपट्टीत ह्रायचा. आय आन् बा संगं. आय, बा बांधकामावर मजुरी करायचे. येश्या वस्तीतल्या इतर पोरांबरुबर ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायचा. त्यादिवशी सिग्नलला आशीच येक गाडी थांबली हुती. येश्या पैकं मिळण्याच्या आशेनं गाडी पुसू लागला. सिग्नल सुटता सुटता गाडीची काच खाली झाली. कसलातरी घमघमाट येश्याच्या नाकात शिरला.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

लेखक Anand More यांनी बुधवार, 06/01/2016 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ______________________________________________________________________________________ जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.

मोसाद - भाग ४

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 06/01/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग १ मोसाद - भाग २ मोसाद - भाग ३ मोसाद - भाग ४ ३ जानेवारी १९४६. न्यूरेम्बर्ग, जर्मनी. सगळ्या जगाला एका फटक्यात बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं. संहार, व्याप्ती, क्रौर्य या सगळ्याच बाबतीत एकमेवाद्वितीय असलेल्या या युद्धानंतर तशीच एक अभूतपूर्व घटना घडली होती.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 05/01/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ _______________________________________________________________________________________ जी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय कि नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 04/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ________________________________________________________________________________________ ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

लेखक सुधीर वैद्य यांनी सोमवार, 04/01/2016 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही. पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 03/01/2016 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं.ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती. ग्रीक शोकांतिकेची पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली. ही कथा म्हटलं तर प्रेमाची. म्हटलं तर असफल प्रेमाची. म्हटलं तर न होऊ शकलेल्या संसाराची.