Skip to main content

लेख

उंच उंच झोका

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात.

रम्य त्या बालपणीच्या आठवणी

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 15/08/2016 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य त्या बालपणीच्या आठवणी. सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचे, विशेष असे कांही भाग किंवा टप्पे असतात.

आमची बोळाची ( काळोखी ) खोली

लेखक मनीमोहोर यांनी सोमवार, 15/08/2016 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्‍या खालच्या लेवलला आहेत. या खोलीला माजघरातुन आत जायला दार आहे. एका बाजुला ओटीची भिंत आणि एका बाजुला माजघराची भित असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही.माजघराच्या दारातुन प्रकाशाचा काय कवडसा येइल तेवढाच प्रकाश.

“Hold the corridor”

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 12/08/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धाचा इतिहास नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,त्यांच्या सेनापतींनी गाजवलेले पराक्रम,त्यांचे यशस्वी ठरलेले डावपेच यावर चर्चा होतात पण काहीवेळा पराभूत होता होता सुद्धा काही सेनानी आपल्या सैन्याचे भवितव्य लक्षात घेऊन काही महत्वाचे डावपेच आखतात आणि ते यशस्वीपणे पार पाडून दाखवतात.

राजाराम सीताराम........भाग १९......धूंद येथ मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 11/08/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. .एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

कुलदिपक - भाग २

लेखक विप्लव यांनी बुधवार, 10/08/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मध्येच कुठे शिरतोयस, भली मोठ्ठी रांग दिसत नाहिये का तुला?" मध्येच घुसू पाहणाऱ्या युवकाला मेघा दटावतच बोलली. त्यासरशी तो युवक चिडून मागे वळला आणि पाहतच राहिला. सुंदर टपोरे डोळे, लांबसडक नाक, रेखीव ओठ, काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी, अहाहा काय ते रुप, जणू सुंदरतेची मुर्तिच. तो युवक मेघाकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या अशा पाहण्याने मेघा अवघडली. कुठे पहावे हेच तिला उमजेना? तिची नजर खाली वळली जमिनीशी उगीच चाळा करणाऱ्या स्वतःच्याच पायाच्या अंगठ्या कडे. "अरे विकी कुठे आहेस अरे फॉर्मवर फोटो. चिकटवायचा राहिला." कुठूनतरी त्याला मित्राने हाक मारली तसा तो समाधीतून बाहेर आला.

कुलदिपक - भाग २

लेखक विप्लव यांनी बुधवार, 10/08/2016 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मध्येच कुठे शिरतोयस, भली मोठ्ठी रांग दिसत नाहिये का तुला?" मध्येच घुसू पाहणाऱ्या युवकाला मेघा दटावतच बोलली. त्यासरशी तो युवक चिडून मागे वळला आणि पाहतच राहिला. सुंदर टपोरे डोळे, लांबसडक नाक, रेखीव ओठ, काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी, अहाहा काय ते रुप, जणू सुंदरतेची मुर्तिच. तो युवक मेघाकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या अशा पाहण्याने मेघा अवघडली. कुठे पहावे हेच तिला उमजेना? तिची नजर खाली वळली जमिनीशी उगीच चाळा करणाऱ्या स्वतःच्याच पायाच्या अंगठ्या कडे. "अरे विकी कुठे आहेस अरे फॉर्मवर फोटो. चिकटवायचा राहिला." कुठूनतरी त्याला मित्राने हाक मारली तसा तो समाधीतून बाहेर आला.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2016 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक...

कुलदिपक

लेखक विप्लव यांनी सोमवार, 08/08/2016 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
" नाही ग आई, ते तसे नाहीत. त्यांच माझ्यावर खुप प्रेम आहे. त्यांनी मला वचन दिलयं लग्नाच." मेघा कळवळून सांगत होती. रडून रडून तिचे टपोरे डोळे सुजले होते. पार्वतीच्या डोळ्यात मात्र अजुनही आग भडकत होती. 'काय केल हे पोरीनं?' मनातच चरफडत होती. ----------*****---------****-------- पार्वतीला गावात सर्वजण पारुमावशी म्हणुन ओळखत असत. पार्वतीचा नवरा भिकाजी अट्टल दारुबाज आणि जुगारी. तसा कष्ट ही करायचा पण मिळवलेले सर्व पैसे नशा करण्यात आणि जुगार खेळण्यात उडवायचा. पार्वति काहि घरामध्ये परटिणीच काम करुन घर चालवायची. पदरात दोन पोर होती मेघा आणि तिच्या पाठचा मंगेश.

शेवटची भेट - (काल्पनीक)

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 07/08/2016 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची भेट - (काल्पनीक) आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता . या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर . अनेक गाजलेले हिंदी , मराठी चित्रपट त्याने या थिएटरच्या सिनेमा हॉलमध्ये पाहिले होते . इंग्रजी हॉलिवूडपटांच्या अचाट दुनियेशीही याच थिएटरमध्ये त्याची ओळख झाली होती .