Skip to main content

हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/09/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?” "अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.” “मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?” “अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.” “पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?” "अरे,एव्हडंच नाही तर अशी स्त्री की जी,अरेरावी,मत्सर,पूर्वग्रह,तिरस्कार,क्षोभ,लालसा आणि स्वार्थ अशा गोष्टींचा पाडाव करून आपलं सामर्थ्य दाखवते" "पण जास्तकरून हे उजवे आणि प्रतिगामी हिलरीला अगदी तू लिहितोस त्याच्या उलट समजतात ना रे भाऊ? का माझं काही चूकलं का?” "नव्हे, नव्हे तूझं काहीही चूकलं नाही.अरे गेले ३०,३५ वर्षं हे उजवे हात धुऊन तिच्या मागे लागले आहेत.आता, राजकारणात पडल्यावर वैमनस्य,चुरस वगैरे आलंच ना?. व्हाईट वॉटर प्रकरण म्हणू नको, मॉनिका लुइन्स्की प्रकरण म्हणू नको, इमेल प्रकरण म्हणू नको, क्लिन्टन फॉउन्डेशन म्हणू नको, ह्या प्रकरणातून काही ना काहीतरी कुजका धागा काढून हिलरीला सतवायला ह्या उजव्याने प्रयत्न सोडलेले नाहीत. आणि गम्मत म्हणजे त्या सर्व प्रकरणातून तिने सईसलामत सुटून घेऊन त्यांना ढेंगा दाखवायला तिने काही कमी केलं नाही. अरे तळ्यात उडी घेतल्यावर पायाची मळ खायला मासे चावा घेत असणारच.तिला एक माहित आहे की कितीदाही नॉकाऊट केलं तरी उठून उभं रहायचं आणि पुन्हा लढत रहायचं.आणि ह्यामुळेच अमेरिकेच्या इतीहासात कधी न घडलं ते म्हणजे पहिली स्त्री प्रेसिडेंटसाठी नॉमिनेट व्हायला ती कारणीभूत झाली. लेबर-डेची सुट्टी संपली.आता प्रचाराला उधाण येणार.२६ सप्टेंबरला हिलरी आणि डॉनॉल्ट ट्रम्प ह्या दोघामधे डिबेट होणार. आयुष्यभर डिबेट करण्यात जिने रस घेतला तिला अशी ही इलेक्शनपूर्वी येणारी तीन डिबेट्स "किस पेडकी पत्तीच" असणार.” "हिलरीबद्दल तुला इतकं का रे वाटतं भाऊ?” "अरे,त्याला बरीच कारणं आहेत.एक म्हणजे एव्हड्या मोठ्या पदावर एक स्त्री विराजमान होण्याचा संभव आहे.हे मला मनापासून आवडलं.गेल्या २४० वर्षाची अमेरिकेच्या इतिहासातली पुरुष प्रेसिडेंट होत आला आहे ही मिरासदारी ती मोडण्याचा संभव आहे.. जगातल्या बहुतेक सर्व स्त्रीयांना स्त्री-वर्गाची एक अतिशय पावरफुल स्री म्हणून अभिमानाची गोष्ट आहे असं वाटण्याचा संभव आहे.बहुतांश स्त्री-वर्गाचा आणि लहान मुलांचा तिच्याकडून काहीना काही फायदा होण्याचा संभव आहे.” "हिलरी प्रेसिडेंट झाली तर ती कमांडर-इन-चीफ होणार म्हणजे रे काय भाऊ?” "अरे,म्हणजे ती विमान-दल,पाय-दल आणि सागरी-दल ह्या तिन्ही दलांची चीफ कमांडर होणार.जगातल्या सर्वात शक्तीशाली मिलीटरी तिच्या आज्ञेत असणार. शिवाय एक हजार न्युकलीअर बॉम्बचं बटण दाबण्याचं तिच्याकडे सामर्थ्य असणार.” "आता मला कळलं,म्हणूनच तू तिला अमेरिकन दुर्गा म्हणतोस का रे भाऊ?” "होय अर्थात.” "जसजसं ही निवडणूक रंगत जाईल तसतशी तू मला माहिती देशील ना रे भाऊ?” "अगदी अलबत.” श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5781
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

अगदी योग्य उपमा दिली आहे दुर्गा. उद्या हिच दुर्गा आय एस आय सारख्या राक्षसी संघटनेंचा नायनाट करो हिच अपेक्षा करतो

In reply to by alokhande

alokhandeजी, "अगदी योग्य उपमा दिली आहे दुर्गा." असं आपण म्हणता हे वाचून बरं वाटलं. "सन्मान्यांचं संरक्षण करण्यासाठी,दुष्टांचा र्‍हास करण्यासाठी मी नेहमी जन्म घेत असतो." असं काहीसं गीतेत म्हटलं आहे. आय एस आय एस सारखे दुष्ट निरनीराळ्या रुपात नेहमीच जन्म घेत असतात.आणि कालांतराने त्यांचा र्‍हास केलाही जातो.ह्या दुर्गेकडून ह्या दुष्टांचा नायनाट व्हावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

थोडे स्पष्ट बोलतो (एक भारतीय म्हणून), अमेरिकन अध्यक्षपदी कोण बुआ/बाई/तृतीयपंथी/गे/कृष्णवर्णीय/ नेटिव्ह अमेरिकन/ हिस्पॅनिक कोणीही बसला तरी मला फरक पडत नाही, फरक पडतो तो एकाच कारणामुळे, ते म्हणजे अमेरिकन पैसा. त्यांचा दबदबा, जो कोणी उपरोल्लेखित सत्तेत येईल त्याने प्रो भारत असणे हीच एक भाषा म्हणून माझी प्रायॉरिटी असेल कायम, international relations is the most blood demanding game ever and diplomacy is its tool. माझी प्रायॉरिटी फक्त अन फक्त भारत आहे, त्याकरिता मी अमेरिकन स्त्री अध्यक्ष वगैरे उदात्त स्त्रीवादी भावही उचलून खड्यासारखा बाजूला सारून ठेऊ शकतो, किंबहुना ठेवतोच. हिलरी असू दे कितीही खमकी, ती प्रो पाकिस्तान आहे, ती सत्तेत आल्यास पाकिस्तानला अमेरिकन झुकतेमाप जायचा चान्स वाढतो, तस्मात मला हिलरी नकोशी वाटते, बाकी तिची एक कुठलीतरी जवळची सहकारी स्त्री थेट अरबी दहशतवादी लिंक्स असलेली होती हे ही वाचले होते, खखोदेजा पण पाकिस्तान मुद्द्यावरून तरी मला हिलरी नकोय मुळीच

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूजी, बहुतांश मराठी माणूस स्पष्टच बोलतो.आपण पण आणि मी पण.परंतु,टोकाची भुमिका घेऊन काहीही साध्य होत नसतं असं मला वाटतं.अहो,उदात्त स्त्रीवादी असणं हे पुरोगामी असण्याचं लक्षण आहे. तरीपण आपला रोष समजण्यासारखा आहे. आता किती दिवस आपण प्रो आणि कॉन करीत बसणार आहो?१२५ कोटी जनतेचा हा भारत देश आहे.५०० रु दहा ग्रॅम सोनं आता ३०,००० रु झालं आहे.. attitude आता बदली पाहिजे.चीन अमेरिकेला ढुम विचारत नाही.याचं कारण त्यांची प्रगती. आपल्यालाही प्रबळ होणं क्रमपात्र आहे.अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण का असेना! छोटे छोटे देश अमेरिकेची पर्वा करीत नाहीत. उदा.व्हिएटनाम.कारण त्यानीही आपली एकॉनॉमी प्रचंड सुधारली आहे.भारताला कशाला पाहिजे अमेरिकेचं झुकतं माप.?who cares for Pak? "कैसे कैसे एसे वैसे होत आहेत आणि एसे वैसे कैसे कैसे होत आहेत."

In reply to by श्रीकृष्ण सामंत

बहुतांश मराठी माणूस स्पष्टच बोलतो. असंच काही नाही सर! इथेच मिपावर नथीतून तीर मारणारे कमी सापडणार नाहीत, असो. ,टोकाची भुमिका घेऊन काहीही साध्य होत नसतं असं मला वाटतं.अहो,उदात्त स्त्रीवादी असणं हे पुरोगामी असण्याचं लक्षण आहे. माझी भूमिका टोकाची आहे का नग्न सत्य (बेयर ट्रुथ) आहे , हा विचार तुम्हीच करा, देशहितासमोर मी पुरोगामित्व तात्कालिकरित्या सोडू शकतो, माझे विचार त्या बाबतीत स्पष्ट आहेत सर,पुरोगामी असल्याचे सर्टिफिकेट मिळवून कोणाचे पोट भरते आता किती दिवस आपण प्रो आणि कॉन करीत बसणार आहो? लोकशाही आहे भारतात तोवर, म्हणजे कायम, चर्चा करताना चांगले वाईट दोन्ही विचार नाही लक्षात घेतले तर कसे होईल?? १२५ कोटी जनतेचा हा भारत देश आहे.५०० रु दहा ग्रॅम सोनं आता ३०,००० रु झालं आहे.. attitude आता बदली पाहिजे सोन्याचे भाव वाढले म्हणून अटीट्यूड बदलायला पाहिजे!? हिलरी ला "येस हिलरी" म्हणून पुरोगामी झाल्यास सोने 500 रु तोळा मिळणार आहे का परत? कसे ते सांगाल जरा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

"असंच काही नाही सर! इथेच मिपावर नथीतून तीर मारणारे कमी सापडणार नाहीत, असो." ह्या आपल्या म्हण्याशी मी पूर्ण सहमत आहे.मी पण अनुभवलेलं आहे.पण काय करणार मिपाचे ते संस्कार असावेत. "उपरोल्लेखित सत्तेत येईल त्याने प्रो भारत असणे हीच एक भाषा म्हणून माझी प्रायॉरिटी असेल कायम," "माझी प्रायॉरिटी फक्त अन फक्त माझा भारत आहे," आपली वरील वाक्यं वाचून मला आपण "टोकाची भुमिका घेत आहां असं वाटलं कारण, असं कसं म्हणता येईल? जो "सत्तेत येईल" त्याला पण त्याच्या देशाचं हित बघायला नको का?ज्याला त्याला त्याच्या देशाचं हित हि प्रायॉरिटी असणारच नाही का?झुकतं माप अपेक्षीत असल्यावर ते देणार्‍याच्याही काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे.असं आपल्याला नाही का वाटत? "लोकशाही आहे भारतात तोवर, म्हणजे कायम, चर्चा करताना चांगले वाईट दोन्ही विचार नाही लक्षात घेतले तर कसे होईल?" असं म्हणून आपणच माझ्या मताला दुजोरा देत आहा. कारण, सत्तेत येणार्‍याच्या देशात सुद्धा लोकशाही आहे.त्यांना सुद्धा प्रो आणि कॉन असणारच हे आपण विसरता. असं वाटून आपण "टोकाची भुमिका घेता" असं मला वाटलं.असो. "सोन्याचे भाव वाढले म्हणून अटीट्यूड बदलायला पाहिजे!? " ५०० रु दहा ग्रॅम सोनं आता ३०,००० रु झालं आहे..(ह्याचा अर्थ भारताची सापंत्तिक स्थिती सुद्धा सुधारली आहे.भारतही प्रबळ होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे भारतीयानी ("झुकत्या मापाची") attitude बदलली पाहिजे असा माझ्या मनातला उघड अर्थ होता. "हिलरी ला "येस हिलरी" म्हणून पुरोगामी झाल्यास सोने 500 रु तोळा मिळणार आहे का परत? कसे ते सांगाल जरा." असं बघा, ५०० रु दहा ग्रॅम सोनं आता ३०,००० रु झालं. ५०० रु दहा ग्रॅम सोनं होतं तेव्हा ५ रुपयाला एक डॉलर मिळायचा. ३०,००० रु दहा ग्रॅम सोनं झालं कारण आता एक डॉलर ६५ रुपयाला मिळतो. "नो हिलरी" म्हटलं असतं तरी तसं व्ह्यायचं राहिलं नसतं.कारण मार्केट फोर्सीसवर कुणाचाही ताबा नाही. "यस हिलरी" असं म्हणून माझ्या १२५ कोटी जनतेचं जर का भलं होत असेल तर "देशहितासमोर मी प्रतिगामीत्व तात्कालिकरित्या पत्करूं शकतो,मग मला,पुरोगामी असल्याचे सर्टिफिकेट नाही मिळालं तरी चालेल. माझीपण प्रायॉरिटी फक्त अन फक्त भारत आहे, त्याकरिता मला अमेरिकन स्त्री अध्यक्ष वगैरे असली तरी चालेल. (मी मुळ भारतीय आहे हे मला विसरून कसं बरं चालेल?) थोडा जास्त स्पष्ट बोललो म्हणून, सर! मला माफ कराल अशी अपेक्षा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हिलरी प्रो- पाकिस्तान आहे, असं नेहेमी म्हटलं जातं. त्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बुश यांनी ९/११ नंतर पाकिस्तानला हवी तशी आर्थिक मदत दिली. मुशर्रफ यांनी त्याचा भरपूर फायदा उचलला. ओबामा सत्तेवर आल्यावर त्या मदतीवर केरी - लुगर बिलाने नियंत्रण घालण्यात आलं. हिलरी यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणारी मदत कुठे खर्च होतेय, यात लक्ष घातलं. पाकिस्तानात लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार टिकून राहावं, लष्करावर नियंत्रण यावं, असा अमेरिकेचा प्रयत्न अलीकडच्या काळात दिसतोय. हिलरी यांनी पाकिस्तानमध्ये २-३ वेळा पत्रकारपरिषदांमध्ये जाहीरपणे आपली सडेतोड मते मांडलीत. तरी त्या प्रो- पाकिस्तान म्हटल्या जातात. त्याचे कारण काय असावे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अमेरिकन अध्यक्षपदी कोण बुआ/बाई/तृतीयपंथी/गे/कृष्णवर्णीय/ नेटिव्ह अमेरिकन/ हिस्पॅनिक कोणीही बसला तरी मला फरक पडत नाही, फरक पडतो तो एकाच कारणामुळे, ते म्हणजे अमेरिकन पैसा. त्यांचा दबदबा, जो कोणी उपरोल्लेखित सत्तेत येईल त्याने प्रो भारत असणे हीच एक भाषा म्हणून माझी प्रायॉरिटी असेल कायम
बाप्पु - कोणीही परदेशी व्यक्ती प्रो भारत असण्यासाठी भारतालाच बदलावे लागेल. ओनस भारतावर आहे. कोणीही राष्ट्राध्यक्ष होवो त्याला प्रोभारत बनवण्याची जबाबदारी भारताचीच आहे. प्रोभारत बनवण्यासाठी अनेक उपाय आहेत, आर्थिक तर फार सोप्पे आणि अमेरीकेला समजण्यासारखे. अमेरीका भारताच्या बाजुनी पूर्वी उभी रहात नव्हती त्याचे कारण भारतानी अमेरीकेला धुडकावले आणि कायम विरोध केला म्हणुन. माझ्या माहीतीप्रमाणे १९६० पर्यंत अमेरीकेला भारता ला मित्र बनवण्यात खुप रस होता.

हिंदू पुराणातली उपमा द्यायचीच असेल तर बाईंकरता कैकेयी, मंथरा, त्राटिका, शूर्पणखा, पूतना ही पात्रे जास्त चपखल वाटतात! तिच्या वागण्यावरुन ती एका लोकशाहीचा नेता बनते आहे का साम्राज्याची महाराणी बनू पहात आहे ते सांगणे कठिण! ह्या बाई निवडून येऊ नयेत ही दुर्गेचरणी प्रार्थना!

In reply to by हुप्प्या

हुप्प्याजी, कैकेयी, मंथरा, त्राटिका, शूर्पणखा, पूतना ह्या स्त्रीयासुद्धा "दूsssरगा" असाव्यात. "डॉट कॉम" झिंदाबाद.

दोन वाईट पर्यायांमधली आहे. ट्रम्पना रिपब्लिकन पक्षातूनच विरोध आहे. हिलरीही प्रचंड स्वार्थी आहेत. साधी गोष्ट आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरणात त्यांनी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनना का सोडलं नाही? कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीने सोडलं असतं. पण माजी फर्स्ट लेडी असण्याचे फायदे मिळाले नसते, ओबामांच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली नसती, सेक्रेटरी आॅफ स्टेट हे अत्यंत महत्वाचं पद मिळालं नसतं आणि आत्ता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं राहता आलं नसतं. आता यावर आक्षेप येतील. पण हा स्वार्थ असल्याशिवाय हिलरींनी हे केलं नसतं. जर त्या क्लिंटन या नावाशिवाय हे सगळं मिळवू शकल्या असत्या तर त्यांनी बिल क्लिंटनना तेव्हाच सोडलं असतं. शिवाय डेमोक्रॅटिक पक्षात कर्तबगार स्त्रिया नाहीत असं अजिबात नाही. पण तरीही हिलरींना प्रायमरीज जिंकता आल्या, त्यामागे क्लिंटन या नावाचं वलय आहे हे नाकारता येत नाही. असो.

In reply to by बोका-ए-आझम

विचार करण्यासारखा अँगल आहे . ऐकीव माहिती : अमेरीकन राष्ट्राध्यक्ष आजवर " विवाहित आणि कॅथॉलिक्च" असतो . त्यामुळे विवाहीत राहण्याचा पर्याय निवडला असेल.

In reply to by कपिलमुनी

पण असं जरुरी नाहीये. जेम्स बुकॅनन हे अमेरिकेचे अध्यक्ष अविवाहित होते. हर्बर्ट हूवर (बहुधा.चूभूद्याघ्या) विधुर होते आणि रोनाल्ड रीगन घटस्फोटित आणि पुनर्विवाहित होते.

In reply to by बोका-ए-आझम

अगदी माझ्याच मनातले विचार ! मागच्याच आठवड्यातच मी नवर्‍याला म्हणत होते की हिलरीने बिल क्लिंटनला न सोडण्यामागे हेच कारण मला वाटते. नुसतंच क्लिंटन नावाने फायदा होतो असे नाही, तर बिल क्लिंटनची उपस्थिती/ सहभाग यांमुळे तर फारच फायदा होतो. काहींना ही शक्यता जरा फिल्मी वाटते - पण फिल्मी असली तरी शक्यता आहेच :)

In reply to by बोका-ए-आझम

सध्या हिलरीवर बेछूट आरोप करण्याचं इकडे पेव फुटलं आहे.तिने काही केलं तर तिच्या हातून ब्रम्हहत्या झाली आहे हे सिद्ध करायला चाढाओढ लागली आहे.गेली २५,३० वर्षं ती सहन करीत आली आहे.स्त्री-शक्तीचं ते एक द्योतक आहे. स्त्री-द्वेष्ट्या पुरूषांपासून आणि स्त्री-लंपट नवर्‍यापासूनसुद्धा जे तिने दिव्य केलं आहे ते तिचं तिलाच माहित. वाचा, It Takes a Village, Tenth Anniversary Edition--by Hillary clinton शिवाय पहा, https://www.youtube.com/watch?v=RXDJyK0xNNo

दोनाल्ड ट्रंपचे मर्कट चाळे पाहता तो निवडून आल्यास अमेरिकन आणि भारतीय भांडवली मार्केट कोसळेल असे वाटते. भारतीय कंपन्यांना अमेरिकेत धंदा करताना अडचणी वाढतील.शिवाय ट्रंप बराचसा धाकटे जॉर्ज बुश यांच्यासार्खाच युद्धखोर वाटतो. नविन कोणते युद्ध (उ. कोरिया किंवा आयसिस विरोधी कारवाईनिमित्त फौजा घुसवणे इ.) झाल्यास नुकतीच सावरलेली अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा गाळात जाईल. आणि जागतिक मार्केट मधला पैशाचा ओघसुद्धा आटेल. बाकी वरती ते सोन्याबापू यांनी लिहिलेले हिलरीचे प्रो-पाकिस्तान असणे वगैरे झेपले नाही. माझ्या अल्पमतीनुसार जागतिक राजकारणात पर्मनंट मित्र-शत्रू नसतात. शिवाय ट्रंप तरी प्रो-इंडिया आहे का हा मुद्दा आहेच. भारतासारख्या गरीब देशाने तरी अमेरिकेला पाहिजे ती आई/हिलरी घा*दे आपला धंदा कसा वाढेल हे पहावे. बाकी सामंत काकांनी दुर्गा वगैरे लिहून उगाचच हिलरीचे उदात्तीकरण केले आहे असे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

अमेरिकन प्रचार इतका खालच्या पातळीवर घसरला आहे की 'भारतात कंडक्ट झालेल्या गेल्या केंद्रीय निवडणुका' अभिमानास्पद वाटत आहेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

'भारतात कंडक्ट झालेल्या गेल्या केंद्रीय निवडणुका' अभिमानास्पद वाटत आहेत. ज्युनिअर बुशच्या दुसर्‍या निवडणुकीचा इतिहास वाचणे मनोरंजक ठरेल ! :)

In reply to by अप्पा जोगळेकर

हिलरीने उत्साहाने इराक युद्धाकरता पाठिंबा दिला होता. त्या युद्धाने व्हायचा तो बट्ट्याबोळ झाला मग आता तिला तिची चूक जाणवू लागली. ती सेक्रेटरी असताना तिने लिबियात गदाफीला पदच्युत करण्याकरता इस्लामी बंडखोरांना सहाय्य केले आणि लिबियाचा बट्ट्याबोळ केला. अमेरिकेचा एक राजदूत ह्या उपद्व्यापापोटी बळी गेला. तरी ट्रंप युद्धखोर? ट्रंपने असे काय केले आहे की ज्याला युद्धखोर म्हणता येईल? उलट हिलरीने तसे केल्याचे ढळढळीत पुरावे असताना ती शांतीदूत? वा! हिलरी आणि ओबामा हे कायम इस्लामी बंडखोरांना झुकते माप देत असतात. लिबियात गदाफी, इजिप्तमधे होस्नी मुबारक आणि सिरियात असाद ह्या तुलनेने निधर्मी नेत्यांविरुद्ध इस्लामी बंडखोरांना मोठी मदत देण्यात ओबामा प्रशासन पुढे होते. तीच गोष्ट ते पाकिस्तानातही करतील असे दिसते आहे. मध्यपूर्वेतले जुलुमी हुकुमशहा आपापल्या देशात अत्याचार करतात पण इस्लामी मूलतत्त्ववादी जगभर अत्याचार करतात. तेव्हा जुलुमी हुकुमशहाच परवडले.

भारतासारख्या गरीब देशाने तरी अमेरिकेला पाहिजे ती आई/हिलरी घा*दे आपला धंदा कसा वाढेल हे पहावे. देवा, ते कसे आ* घालतात त्यावर आपल्या धंद्याची गोळा बेरीज अवलंबून नसेल का? (अर्थशास्रातले काही कळत नसल्याकारणे विचारलेला जेन्युइन प्रश्न आहे हो हा) दुसरे म्हणजे ते पर्मनंट मित्र शत्रू नसतात वगैरे म्हणणे टेक्स्टबुक ऍप्रोच प्रमाणे ठीकच आहे, पण मुळात तसे दिसून येत नाही, पण ते एक तूर्तास असो, जागतिकीकरण झाल्यावर जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला त्यांना घालायची तशी आई घा* दे म्हणणे एक निसरडे वाक्य ठरावे असे वैयक्तिक मत आहे, अर्थात तुमच्यामताचा आदर आहेच

हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.
अरेरे कधी पासून मानेचा त्रास सुरू आहे ? आमच्या नाक्यवर हाड वैद्य आहे त्याला दाखवायला सांगा :)

..

काय दुर्दैव आहे पहा अमेरिकन नागरिकांचे! राष्ट्रध्यक्षांच्या निवडणुकीत त्यांचे पर्याय काय, तर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन! ह्यापेक्षा आपल्याकडील पंतप्रधानपदाचा कोणताही उमेदवार (अपवाद सोडून) दहा पटीने सरस आहे. अर्थात, तिकडे प्रेसिडेंट कोण आहे ह्याला काहीही किंमत नाही. बाकीचेच सगळे - पेंटागॉन इत्यादी - त्यांची धोरणे ठरवितात, तीही 20-25 वर्षांनंतरची. प्रेसिडेंट आपला मम म्हणायला. हे असे मला वाटते; चूक असेल तर सुधारायला वाव आहेच. बाकी, क्लिंटनबद्दल VIKI Leak काय बॉम्ब टाकतो त्याची वाट बघूया.

रविकिरण फडके, त्यासाठी विकीलीकची गरज नाही. क्लिंटन दांपत्य कमालीचे भ्रष्ट आहे हे उभ्या दुनियेस ठाऊक आहे. बिल्लू (क्लिंटन) चा चमचा राम एमानुअल त्यांचा प्रमुख द्रव्यप्रक्षालक (= money launderer) आहे. क्लिंटनने शिकागो स्टॉक एक्सचेंजवर गैरमार्गाने दाबून पैसा कमावला आहे. शिवाय अर्कान्ससचा राज्यपाल असतांना मीना विमानतळावरील अंमली पदार्थांच्या व्यापारात त्याची बरीच भागीदारी होती. चिन्यांकडून माल येत असे. हा माल म्हणजे शिकागो स्टॉक एक्सचेंजवर अवैध व्यवहार सोयाबीनच्या नावाखाली खपवून उत्पन्न झालेल्या पैशातून विकत घेतला जाई. चिन्यांकडून बिल्लूस मानवी अवयवसुद्धा मिळंत असंत. ते विकून क्लिंटन दांपत्याने आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. क्लिंटन न्यास (=foundation) हा भ्रष्टाचाराचा भला थोरला अड्डा आहे. याच राम एमानुअलने बिल्लूस मोनिकाच्या लफड्यात अडकवले म्हणतात. तर काही लोकं म्हणतात की बिल्लूवर महाभियोग (=impeachment) दाखल होणार होता. त्यापासून सुटण्यासाठी बनावट मोनिकाकांड घडवण्यात आलं. चंद्रा लेव्ही नावाच्या गुप्तचारिणीचा जसा खून केला तशीच मोनिकाची गत होईल अशी तिला धमकी देण्यात आली. मोनिका बिचारी चुपचाप नाटकात सामील झाली. बिल्लूचा अवयव तोंडात घेण्याची तिची रसभरीत वर्णनं बकवास आहेत हेवेसांन. आता हीच भ्रष्टसंगी हिलरी अमेरिकी लोकांना शहाणपण शिकवू लागली आहे. तर लोकांना प्रश्न पडलाय की डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरीच का उभी आहे? त्याचं उत्तर आहे तिची प्रकृती. हो, हिलरी मरायला टेकलेली आहे. तिचं चित्तं थाऱ्यावर नसतं. गेल्या २७०+ दिवसांत तिने एकही पत्रकार परिषद घेतली नाहीये. 'हिलरी बऱ्याचदा गोंधळलेली असते', इति हुमा अबिदीन (=हिलरीची स्वीय सहायक). तिला आकडी (=fits) येतात. एकदोन प्रसंग तूनळीवर आहेत. जिज्ञासूंनी अवश्य बघावेत. तिची तब्ब्येत ढासळती आहे. केव्हाही गचकेलशी परिस्थिती आहे. जेमतेम उभी असते. तर मग तिला अध्यक्ष बनवण्यात काय अर्थ? अर्थ बराच गहन आहे. जर अध्यक्ष पदावर असतांना मेला/मेली तर त्यावेळचा उपाध्यक्ष आपोआप अमेरिकेचा अध्यक्ष बनतो. कुठलीही निवडणूक न लढवता सत्ता हस्तगत करायची नामी युक्ती आहे. रिचर्ड निक्सनास १९७४ साली वॉटरगेट प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला. तेव्हा जेराल्ड फोर्ड उपाध्यक्ष होता, जो आपसूक अध्यक्ष झाला. त्यावेळेस फोर्डने निवडलेला उपाध्यक्ष होता नेल्सन रॉकफेलर ! लोकं बरेच शंकित झाले होते. रॉकफेलर सारखा प्रभावशाली उद्योगपती लोकशाही मार्गास बगल देऊन व्हाईट हाऊसच्या नजीक आलेला अनेकांना खपला नाही. जेराल्ड फोर्ड मरणार आणि नेल्सन रॉकफेलर अध्यक्ष होणार अशा कंड्या पिकल्या. पण तसं काही झालं नाही. नुकताच तपभर पूर्वी (१९६३ साली) केनेडींचा खून झाला होता. परत एकदा विद्यमान राष्ट्राध्यक्षाची हत्या झाली तर अमेरिकेचा दबदबा संपला असता. म्हणून बहुधा फोर्ड बचावला. आता तशीच परिस्थिती आणि तीच संधी हिलरीच्या रूपाने चालून आली आहे. तिची अर्धी लाकडं मसणात पोचलेली असल्याने तिचा काटा काढणं फारसं अवघड नसावं. आ.न., -गा.पै.

In reply to by बोका-ए-आझम

https://en.wikipedia.org/wiki/Chandra_Levy_homicide चंद्रा लेव्ही ही एक केंद्रीय कारावास विभाग, वॉशिंग्टन डी सी शहरात नवशिकी उमेदवार (इंटर्न) म्हणून कामाला होती. एका काँग्रेसमन (साधारण खासदाराच्या तोडीचा लोकप्रतिनिधी) बरोबर तिचे लफडे होते. तिचा खून झाला आणि तो काँग्रेसमन गोत्यात आला. वास्तविक त्याच्यावर खुनाचा आरोप कधीच नव्हता. पण लफडे उघडकीस आल्यामुळे त्याची कारकीर्द संपली. नंतर कधीतरी तिचा खुनी पकडला गेला. तिचे क्लिंटन दांपत्य व त्यांच्या लफड्यांशी काही संबंध असल्याचे आत्तापर्यंत वाचले नव्हते. वरील प्रतिसादात अनेक कॉन्स्पिरसी थियर्या मांडल्या गेल्या आहेत. त्या कितपत खर्‍या असतील ते सांगणे कठिण आहे. पण क्लिंटन दांपत्य (आणि मुलगीही) प्रचंड श्रीमंत आहेत हे नक्की. एकेका भाषणाकरता त्यांना कोट्यावधी डॉलर्स मिळतात. ते खरोखर भाषणाकरता दिले जातात का कुठला आतबट्ट्याचा व्यवहार आहे तेही कळत नाही. हे सगळे सरळ वाटत नाही. असो. तमाम बुद्धीवादी, विनोदवीर, अभिनेते, उद्योगपती हिलरीमागे एकवटले आहेत. वित्त आणि विचारमौक्तिके मुक्तहस्ते उधळत आहेत. पण तरीही म्हणावे तितके यश येत नाही. ट्रंप आणि हिलरी तुल्यबळ आहेत. थोडेफार वरखाली झाले तरी अनेकांची अशी अपेक्षा होती की हिलरी प्रचंड पुढे असायला हवी होती. पण सुदैवाने तसे झालेले नाही. बघू. घोडामैदान जवळच आहे!

In reply to by हुप्प्या

हुप्प्या, माझ्या माहितीनुसार चंद्रा लेव्ही आणि क्लिंटन दुक्कल यांचा काही संबंध नाही. अर्थात, असलाच तर भविष्यात उघडकीस येऊ शकतो म्हणा! आ.न., -गा.पै.

In reply to by राजाभाऊ

राजाभाऊ, आपल्या सूचनेबदद्ल धन्यवाद. पण काये की क्लिंटन बॉडी काउंट हे बरंच मोठं खटलं आहे (सेथ रिचचं नाव आहे तिथे). आ.न., -गा.पै.

ट्रंप पेक्षा हिलरी बरी आहे म्हणुन हिलरी निवडुन यावी. ट्रम्प अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणुन कल्पनाही करवत नाही.

भूभूभू (अबब) इथं ऑलरेडी बीजेपी/मोदी भक्त/विरोधकांचा सुळसुळाट कमी होता काय की आता हिलरी अन ट्रम्प वर टकुरी फोडणे सुरु आहे! आजकाल माणसेच जास्त भुकत्यात (हाडूक भक्त)

ढेल्या


हमरिका जागतिक मानवी हक्क (अंमलबजावणी- हनन शोधकार्य) वगैरे जसे करते तसेच जर हिलरी ने निवडून आल्यावर जागतिक श्वान हक्क रखवालदारी करायचा मक्ता घेतला तर येऊ दे हिलरी, नाहीतर कोणी अजून आम्ही आपले कुई कुई करीत बसणार

In reply to by फेदरवेट साहेब

ओ भभुआ, तुमरी औरत तो मनेका होवत ना? इ हिलरीके पीछे क्यंव दवडत हो चारों पग हवामें फडफडाके? आ.न., -गा.पै.