लेख
रिफील (शतशब्दकथा)
रिफील
बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले.
बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला.
दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता.
झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला..
"काय करता रे!
समंदर के लुटेरे
समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान व त्यांनी लुटलेला खजिना.
इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली.
इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली.पत्ता
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही
तर आता मुख्य विषयाकडे ,
मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.
बोट – Girl In Every Port
Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते!
वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात.
सेंटिनल द्वीपचे रहस्य
आदिवासी लोकांबद्दल तशी आपल्याला बरीच माहिती आहे, त्यांची भाषा जीवनशैली त्यांचे राहणीमान,कारण त्यांचा प्रगत जगाशी बऱ्यापैकी संपर्क असतो. परंतु आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही.
दक्षिण अमेरिकेत अमेझॉन च्या घनदाट जंगलात, ब्राझील व पेरू देशांमध्ये अशा आदिवासी जमाती राहतात ज्यांच्या बद्दल इतर जगास काहीही माहिती नाही.
बलुचिस्तानची तोंडओळख
बलुचिस्तानची तोंडओळख
लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx
‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल.
माझा मिपाविश्व प्रवेश
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले.
पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development) (भाग २) : पाणी
ह्या महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर बर्यापैकी पाउस झाला आहे. ह्यावर्षी तरी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्याव लागेल असा वाटत नाही पण मागील वर्षान्सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून पाणी वापराचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत हे आपण नेहमीच मानत आलो आहोत पण ह्या तीन मुलभूत गरजांपेक्षा हि मुलभूत गरज हि पाण्याची आहे. मानवी जीवनात पाण्याचा फक्त पिण्यासाठी एवढीच भूमिका नसून शेती साठी, स्वच्छतेसाठी/ आरोग्यासाठी, वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रियांसाठी ते अगदी मनोरंजनासाठी देखील पाणी गरजेचे आहे.
ठहरने को बोला है
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.
माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.
मिसळपाव
