वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - सेमीफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड
२४ मार्च २०१५
इडन पार्क, ऑकलंड
ऑकलंडच्या इडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलमध्ये मार्टीन गप्टीलच्या २३७ रन्सच्या इनिंग्जमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला १४३ रन्सनी धूळ चारली होती तर श्रीलंकेविरुद्धची क्वार्टरफायनल आरामात जिंकून दक्षिण आफ्रीकेने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. १९९२ मधल्या आपल्या पहिल्या वर्ल्डकपपासून अखेर ७ व्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेने नॉकआऊट स्टेजमध्ये आपली पहिली मॅच जिंकण्यात यश मिळवलं होतं. न्यूझीलंडची ही ७ वी सेमीफायनल तर दक्षिण आफ्रीकेची ४ थी!
मिसळपाव