Skip to main content

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

लेखक शरुबाबा यांनी शुक्रवार, 01/02/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख . शिर्डीतून मराठी हद्दपार? शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात. रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही .

दीदीना भाईकाकांच्या नावचा पुरस्कार!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 31/01/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा.

शून्य - एक सस्पेन्स थ्रीलर मराठी कादंबरी

लेखक सुनिल डोईफोडे यांनी बुधवार, 09/01/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी) http://marathionlinenovel.blogspot.com हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते. उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य.

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/12/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 01/12/2007 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/11/2007 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू अमेरिकन फांऊंडेशनच्या प्रयत्नाने अमेरिकन काँग्रेस (३५८-०) दिवाळी निमित्त ठराव संमत झाला. तसाच ठराव हा सिनेटमधे पण आहे आणि तो अजून मतदानास येयचा आहे. यात (हिंदू अमेरिकन फांऊंडेश) माझ्या माहीतीप्रमाणे, सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. या ठरावाची भाषा वाचण्यासारखी वाटली म्हणून येथे जशीच्या तशी इंग्रजीत चिकटवत आहे. मूळ माहीती सारखी आहे फक्त सिनेट/हाऊस मधील ठराव थोडासा वेगळा आहे. 110th CONGRESS House resolution 747 S. RES. 299 Recognizing the religious and historical significance of the festival of Diwali.

बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 24/10/2007 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती.