ह्या आठवड्याच्या
टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे. पण रशियासारख्या एकेकाळी जरी महासत्ता असणार्या पण सध्या तरी एक दरिद्री राष्ट्र म्हणून ओळख असणार्या राष्ट्राच्या इराण युतीची जगाने पर्वा का करावी? त्यासाठी इथे थोडासा जागतिक इतिहासातील संदर्भ देतो.
सध्याच्या जगातील सगळ्यात ज्वलंत आणि संवेदनशील भाग म्हणजे कोणता? असे विचारले तर ह्याचे उत्तर कोणेही देईल 'मध्य पूर्वेतील देश'. 'कोणत्याही प्रश्नांवर बेसुमार कत्तली हा एकमेव उपाय आहे' ह्या विचारसरणीवर आधारलेल्या अनेक अतिरेकी संघटना ह्याच भागात आपली मुळे घट्ट रोवुन आहेत. परंतु ह्या सगळ्यांच्यातील पाशवीपणाला वाट करुन देण्यासाठी त्याना सशत्र करत आहे रशिया आणि त्यातुन फुटलेली राष्ट्रे.साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रेगनच्या नेतृत्वाखाली संपत आलेले
शीतयुद्ध अखेर सिनियर बुश साहेबाच्या करकिर्दित एकदाचे संपले आणि जगाने तिसरे महायुद्ध टळले असा सुस्कारा टाकला. पण ह्या शीतयुद्धामध्ये रेगनने वापरलेली एक क्लुप्ती म्हणजे रशियाशी केलेली शस्त्रास्त्र स्पर्धा असे मानले जाते. आधिच डबघाईला आलेला रशिया ह्या शस्त्रांस्त्रांच्या शर्यतीत पार कंगाल झाला आणि शेवटी अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे मोडकळीस आला. अनेक वर्षंचे शीतयुद्ध जरी संपले तरी त्याने मागे ठेवली ती रशिया आणि त्यातून फुटलेली कंगाल राष्ट्रे, ज्यांच्याकडे खाण्या पिण्याची मारामार होती पण त्याचबरोबर कधिही न वापरलेल्या कोर्या करकरीत आधुनिक शश्त्रास्त्रांचे ढिगारे गंजत पडले होते. प्रत्यक्ष युद्ध तर कधी खेळलेच गेले नाही मग काय झाले ह्या प्रचंड शस्त्रसाठ्याचे?
 |
|
शीतयुद्धांनंतर शस्त्रांची ही प्रचंड कोठारे उघडली गेली आणि हेजबुल्ला ते अल कायदापासुन सुदान आणि लायबेरिया पर्यंत ५ ते ९५ वर्षां पर्यंतच्या सर्वांच्या हातात ह्या बंदुका पोहचु लागल्या. आज जगभरात जवळपास प्रत्येक अतिरेक्याच्या हातात दिसणारी ऑटोमेटीक कलाशीनिकव्ह (ए के ४७/५६) ही बंदुक रशीयन बनावटीची आहे. (आपला संजय दत्त ज्यासाठी आयुष्यभरसाठी गोत्यात आला ती देखिल हीच बंदुक) बंदुका, तोफा, इतकेच काय लढाऊ विमाने आणि हॅलीकॉप्टर पासून विध्वंसक क्षेपणास्त्रापर्यंत कुणालाही, कुठेही रशियातुन पोहिचवले जाते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीतुन कल्पना येईल की इराण आणि रशिया ह्यांची युती इतकी धोकादायक का आहे ते. इराणला न्युक्लिअर रिऍक्टअर्स खरेदी करायचे आहेत आणि पुतिन तो सौदा लवकरात लवकरात करून कमाई करण्याच्या तयारीला लागला आहे.अर्थातच, जिथले नेतृत्व अतिरेकी संघटनांच्या पाठींब्यावर ठरते अश्या देशांच्या हातात अणुबाँब देणे म्हणजे अवघ्या जगावर संकट ओढावून घेण्यासारखे आहे.
 |
|
इतके सगळे निराशाजनक लिहिल्यावर ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार लावण्यासाठी एक आशाजनक घडामोड देखिल देतो. रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे. हाच कास्पारोव्ह आता पुतिन राजवटीच्या दंडुकशाहीसमोर दंड थोपटून उभारला आहे. गेल्या एक दोन आठवड्यातील अमेरिकन कार्यक्रमांमध्ये त्याची मुलाखत पाहिल्यावर त्याच्या हुशारीची चुणुक दिसुन आली. राजकारण आणि राजकारणी असे म्हंटल्यावर आपल्या मनात जे एक चित्र उभारते त्याच्या बरोबर उलट चित्र कास्पारोव्हच्या मुलाखतींमधून दिसले. रशियात लोकशाही आणण्यासाठी कास्पारोव्ह आणि त्याचे समर्थक अक्षरशः जीव धोक्यात घालत आहेत.
कास्पारोव्हच्या अमेरिकन टी.व्ही. वरील मुलाखतीमध्ये उत्तरे देताना अनेक ठीकाणी त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दीली. लोकाशाही आणायाचा कितीही प्रयत्न केला तरी रशियातील मने कधीही लोकशाहीचा स्विकार करणार नाहीत हे विधान खोडून काढताना त्याने उत्तर आणि दक्षिण कोरिया, तसेच तैवान आणि पश्चिम पूर्व जर्मनीची उदाहरणे देऊन आपली ह्या विषयवारील पकड दाखवली. उत्तर कोरिया आणि दक्षीण कोरिया दोन्ही देशातील लोक हे एकच असले तरी उत्तर कोरिया हा कट्टर साम्यवादामुळे मागासलेला देश तर दक्षिण कोरिया हा लोकशाही आणि खुली अर्थव्यवस्था असणारा प्रगत देश आहे. लोकांची मने एखादी व्यवस्था कधीही स्विकारू शकणार नाहीत हे विधान किती तकलादू आहे हे त्यातुन दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले.
मंडळी, रशिया म्हणजे काही कॅलीफोर्निया नव्हे. आपल्या शत्रुंना जेवणात विष घालून मारणार्या कुटील पुतिनसमोर बुद्धीजीवी कास्पारोव्ह किती टिकणार हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. पण असं झाल्यास संपुर्ण जगाच्या दॄष्टीने ती आनंदाची बातमी ठरेल ह्याची मला तरी खात्री असल्याने कास्परोव्हला शुभेच्छा देऊन हा लेख संपवतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाच लेख आमच्या
अनुदिनीवर देखिल वाचता येईल.
आवडला
In reply to आवडला by नंदन
असेच
लेख आवडला
बापरे!
In reply to बापरे! by गुंडोपंत
गुंडोपंत
In reply to गुंडोपंत by कोलबेर
अहाहा
In reply to अहाहा by गुंडोपंत
एकांगी
In reply to एकांगी by कोलबेर
कारण
कोलबेर छान रे वेगळे लिहले आहेस!
In reply to कोलबेर छान रे वेगळे लिहले आहेस! by सहज
हेच!
In reply to कोलबेर छान रे वेगळे लिहले आहेस! by सहज
अभद्र युती
In reply to अभद्र युती by कोलबेर
अरे तुझी समजण्यात चुक होतीय
लेख आवडला
सुंदर लेख..
In reply to सुंदर लेख.. by विसोबा खेचर
मिसळपाव
In reply to मिसळपाव by कोलबेर
जरूर
छान,,,
मस्त!
In reply to मस्त! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुकूल
In reply to अनुकूल by कोलबेर
संदर्भ
In reply to संदर्भ by गुंडोपंत
संदर्भ
In reply to संदर्भ by कोलबेर
योग्य!
योग्य वेळ
लेख आवडला.
शीतयुद्धातले अमेरिकेचे अदूरदृष्टीचे धोरण
In reply to शीतयुद्धातले अमेरिकेचे अदूरदृष्टीचे धोरण by धनंजय
अमेरिका
In reply to अमेरिका by कोलबेर
१०१% सहमत!
लेख आवडला.
हा व्हिडियो
In reply to हा व्हिडियो by गुंडोपंत
चार्ली कम्युनिष्ट