Skip to main content

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

लेखक सुनील मोहन यांनी गुरुवार, 04/12/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 03/12/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ.

केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांनी भागणार नाही....

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांकडे केवळ शस्त्रेच कमी आहेत असं नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी जागांचीही कमतरता आहे असं दिसतंय, firing ranges (आवश्यक असल्यास खाजगी देखील) मिळायला हवीत.

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

नव्या दिशा (???) !!!

लेखक अभिजीत यांनी रविवार, 30/11/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे. या दोन बातम्या पहा - यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे. यात प्रथमच मतदान करणार्‍यांचा समावेश होता. मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

बल "सागर" भारत

लेखक विकास यांनी शुक्रवार, 21/11/2008 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे! निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले.

राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 15/11/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार. आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

लेखक शिंगाड्या यांनी गुरुवार, 06/11/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)