Skip to main content

बातमी

सलोनी लायब्ररी (वाचनालय) ची दुसरी शाखा...

लेखक प्रगती यांनी शनिवार, 02/08/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना सांगण्यास मला आनंद होतो आहे की आपल्या सलोनी लायब्ररीची दुसरी शाखा या महीन्यापासून ठाणे (पूर्व) कोपरी येथे सुरु होत आहे. आपली पहीली शाखा सुरु झाल्याला या दसर्याला ३ वर्ष होतील आणि आजपर्यत आपल्या लायब्ररीला हजार लोकांनी भेट दिली आहे, आणि आज लायब्ररीचे सहाशे सभासद आहेत. आम्ही लायब्ररी चालू करताना आम्हाला घरच्या लोकांकडून तसेच बाहेरच्या लोकांकडून फार विरोध झाला सगळे आम्हाला सांगत होते की अरे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर झटपट व लवकर पैसा मिळेल अशा धंदयामद्ये करा. लायब्ररी कशाला टाकता त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही.

निरागस

लेखक स्मित यांनी शुक्रवार, 01/08/2008 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी..... नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात. एक पत्र असे होते........ Dear God Heaven We don't have money. Dad is jobless and mama is sick. Please send us 500$ so that we can celebrate Christmus. Yours, John पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले.

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

लेखक नंदन यांनी गुरुवार, 31/07/2008 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल. मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 28/07/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे. मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे. मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे. पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे. Potpourri of information Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.

गुरूपुष्यामृत योग

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 26/07/2008 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, गुरूपुष्यामृत योग दिनांक ३१ जुलै रोजी येत आहे. यालाच गुरू पुष्य अमृतसिद्धीयोग असेही म्हणतात. हा योग सायंकाळी ०७ वाजून २६ मिनिटांपासून ते शुक्रवारी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे. आपला, (पंचांगी) धोंडोपंत

लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च

लेखक विकास यांनी शनिवार, 26/07/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.

मंगेश पाडगावकरांचे बेळगावात काव्यवाचन.

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 13/07/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज १३जुलै. नामवंत कवयित्री इंदिरा संत यांचा ८वा स्मृतिदिन. संत कुटुंबियांच्यावतीने दरवर्षी या दिवशी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थिनीचा आणि तिच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर उपस्थित होते. डोह, कोरडी भिक्षा या पुस्तकांचे लेखक आणि मौजेचे संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. पाडगावकरांच्या सत्कारानंतर त्यांनी त्यांच्या सर्व लोकप्रिय रचना सादर केल्या. ८०व्या वर्षातला त्यांचा उत्साह, तडफ, जोम सर्वानाच चकित करून गेला.

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 27/06/2008 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली.

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

लेखक धमाल बाळ यांनी शुक्रवार, 27/06/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वार्ताहाराकडुन दिनांक २२ जुन स्थळ : भांबुर्डा २२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही. याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली.