लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)
नमस्कार मंडळी,
आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे.
आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे.
पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :)
या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का?
मिसळपाव
