Skip to main content

गुगल क्रोम - काय असेल ?

लेखक वाचक यांनी मंगळवार, 28/07/2009 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
'क्रोम' गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अ‍ॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :) गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकांसाठी आहे.

मुंबईच्या किनार्‍यावर लाटांचे आक्रमण

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 24/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या किनार्‍यावर धडकणार्‍या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही.

पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण -अधिक माहिती हवी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090724/pnv02.htm http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4814400.cms पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण झालेली आहे. निरागस बालके आजारी पडत आहेत. टि.व्ही. त या रोगावर काही उपचार उपलब्ध नाही असे पाहीले. खरे काय, खोटे काय? त्याची त्रिव्रता किती? अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी? जाणकार प्रबोघन करतील काय?

म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 22/07/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे पहिलेच संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तसेच म्युचल फंड गुंतवणुकी संदर्भात प्रश्न विचारू शकता व चर्चेतही सहभागी होऊ शकता. येथे टिचकी मारून आपण संकेतस्थळावर जाऊ शकता. तुमचा सहभाग आम्हाला सुधारणा करण्यास मदतच करेल. सदानंद

ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 21/07/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ह्र्दयविकाराने व श्वसनाच्या दुखण्याने आज हुबळी येथे सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. त्या गानतपस्विनीला श्रद्धांजली.

निळूभाऊंकरता प्रार्थना..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 09/07/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सहजसुंदर अभिनय कौशल्याने गेली अनेक दशकं तमाम मराठी रसिकांची मनं जिंकलेले, आणि उत्तम कलेसोबतच संवेदनशील सामाजिक जाणीव असलेले गुणी कलाकार, एक अत्यंत सर्जनशील, सहृदय व्यक्तिमत्व निळू फुले म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांचे लाडके निळूभाऊ गेले काही दिवस आजारी आहेत.. त्यांना श्वसननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलेले असून सध्या ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा हीच ईश्वरचरणी सार्‍या मिपा परिवारातर्फे प्रार्थना...! तात्या.

मायकेल जॅक्सन गेला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 26/06/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले. http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

लेखक विकास यांनी बुधवार, 24/06/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

अली अकबर गेले ! सूर लोपले!

लेखक टायबेरीअस यांनी शुक्रवार, 19/06/2009 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खा यांचे आज निधन झाले. भारतीय सन्गीत जगप्रसिध्द करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज भारतीय संगीताला जे आंतरराष्ट्रिय व्यासपीठ मिळालय त्याची बीजं अलि अकबर आणि रवि शंकर ह्यांनी रुजवली आहेत. उस्ताद्जींना भावपूर्ण श्रध्दांजली. - शुभंकर. फार वाईट झाले.. माझी भावपूर्ण श्रद्धांजली!! (एकाच बातमीचे दोन धागे झाल्याने दोन्ही धागे एकत्र करून दिले आहेत.) - संपादक.

रत्नपारखी शिवराय-भाग-१-बाजी पासलकर पुस्तकाचे प्रकाशन

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 08/06/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या आणि समस्त मिपा कर, सप्रेम नमस्कार ! कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे ३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे !