Skip to main content

जनजागृतीसाठी हा मेल देत आहे!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 14/08/2010 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... प्रथम महत्वाच्या व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी : १)हा लेख १००% सत्यघटनेवर आधारलेला आहे,कुणास कोणतीही शंका असल्यास ती स्वःतकडेच ठेवावी,आम्ही खुलासा करणार नाही.

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक "शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात. सगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ.

सावरकर आजोबा गेले.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही. मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.

ग्रंथस्नेह : मराठी पुस्तकांचे घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय

लेखक सुप्रिया म्हात्रे यांनी बुधवार, 11/08/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथस्नेह वाचनालय ग्रंथस्नेह हे सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान कोणत्याही पत्त्यावर कार्यालयात किंवा घरी अशी घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय आहे. वाचनालयाचा पत्ता- एफ-५-१, स. गो. बर्वेनगर, मुक्ताबाई रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८४ असा आहे. वाचनालयात दूरध्वनी ९८६९०२४०६१ किंवा इ-मेलद्वारे granthasneh@gmail.com पुस्तक नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. येथे सर्वप्रकारच्या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध आहेत.

प्रिटी वूमनचे धर्मांतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 06/08/2010 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लाडक्या प्रिटी वूमनने धर्मांतर केले असून तिला आता यापुढे हिंदू म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा आहे. बातमीचा दुवा सदर प्रिटी वूमनचा राजकुमार यापूर्वीच बौद्धधर्मिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कॅशियस क्लेचा महंमद अली होतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना मुस्लिमधर्म स्वीकारतो. आमचे लाडके गझलसम्राट सुरेश भटदेखिल आयुष्याच्या अखेरीस बुद्धाला शरण जातात. अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात? खरोखरच वेगळी जाणीव की केवळ प्रसिद्धीचा शौक?

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

साहित्यसंपदा.कॉम

लेखक अभिमोहित यांनी रविवार, 01/08/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आजच्या पिढीला वाचण्याची सवयच नाही" हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांना वाचायला आवडतील अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवणारी प्रभावी यंत्रणाच आज आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यातच वाचनालयांची स्थितीही म्हणावी तशी समाधानकारक नाही. आपल्याला हव्या त्या पुस्तकांसाठी दिवसेंदिवस वाट बघावी लागते. चोवीस तास ऑनलाईन असणारे, पुस्तकांवरही तितकेच प्रेम करतात, पण आपल्याला पाहिजे असलेल्या पुस्तकासाठी असे दिवसेंदिवस वाट पहाणे त्याना पटत नाही. वाचायची इच्छा असुनही या तरुण वाचकांपर्यंत पुस्तक पोहचतच नाही. पुस्तकं त्यांच्या टप्यात आली तर वाचन संस्कृती अजुन वाढेल.

कलात्म

लेखक नीधप यांनी बुधवार, 28/07/2010 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
योग्य विभाग न लक्षात आल्यामुळे जनातलं मनातलं मधे हे टाकतेय. ------------------------------- महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अ‍ॅण्ड मिडीया या संस्थेने. एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत. रवी परांजपे, डॉ.

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 18/07/2010 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते.