कलात्म
लेखनप्रकार
योग्य विभाग न लक्षात आल्यामुळे जनातलं मनातलं मधे हे टाकतेय.
-------------------------------
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कलाजगताबद्दल एक विशेषांक काढला आहे माइंड अॅण्ड मिडीया या संस्थेने.
एकूण दोन भागात असलेल्या या विषेशांकाचे नाव कलात्म असे आहे. अतिथी संपादक स्वतः डॉ. श्रीराम लागू आहेत. ऐल आणि पैल असे दोन भाग आहेत. एकूण मिळून साधारण ८० लेख आहेत.
रवी परांजपे, डॉ. द भि कुलकर्णी, प्रभा अत्रे, शांता गोखले, सुरेश तळवलकर, मीना कर्णिक, श्यामला वनारसे, शमा भाटे, सुधीर गाडगीळ, विठ्ठल उमप, माधव वझे, वामन केंद्रे, प्रवीण भोळे, कमलेश वालावलकर, दासू वैद्य, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, राजन खान, चंद्रकांत कुलकर्णी, रंगनाथ पाठारे, नागराज मंजुळे, मंगेश हाडवळे, समीर विद्वांस, वैभव आरेकर, चैतन्य कुंटे, हिमांशू स्मार्त अश्या अनेक विविध कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांच्या लेख/ मुलाखतींबरोबरच कलाकारण या विभागात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे अश्या काही राजकारणी लोकांशी केलेली कलाविषयक बातचीत हे ही आहे.
संग्रही ठेवावेत असे अंक आहेत.
हे दोन अंक आणि संजय आवटे यांचं कला कल्पतरूंचे आरव - आनंदाचे झरे जपायचे कसे? हे पुस्तक असा संच सध्या सवलतीच्या दरात (रू. ३००) उपलब्धही आहे. त्यासाठी 08975969338 - ऋतुजा मुळे या क्रमांकावर संपर्क करा. तसेच मायबोली या संकेतस्थळाच्या खरेदी विभागातही हा अंक उपलब्ध आहे.
जाता जाता माझाही एक लेख यात आहे. :)
पण माझ्या लेखापेक्षा काही खरंच खूप महत्वाचे लेख आहेत म्हणून हे इथे सांगतेय.
-नी
वाचने
2097
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
:)
छान वाचला पाहिजे! आम्हाला त्या कलाक्षेत्रातल काय कळतय म्हणुन वाचणे टाळायला नको.
ऐल व पैल ही विभागाची नावे कल्पक.
अरे वा वाचायला हव.
वा ! वा ! वा !
मेजवानीच असणार हा अंक. वाचायलाच हवा.
दिग्गजांसमवेत तुमचा पण लेख आला त्याबद्दल विशेष अभिनंदन. :)
जाहीरात आवडली. नक्कीच वाचु. ;)
बाकी ते ऐल चुकिचे वाटते.
In reply to जाहीरात आवडली. नक्कीच वाचु. by मितभाषी
ह्म्म्म
अहो मी नाहीये दिलं ते नाव. मला तर लेख देईतो एवढं काही मोठं प्रकरण असणारे हे पण माहित नव्हतं. अभिरामनी मागितला मी दिला.
पण ऐल चुकीचं का बरं?
धन्यवाद. उत्तमच असणार अंक. तुझेही अभिनंदन.
हम्म्म...