आस्वाद
वख्तने किया क्या हसीं सितम
वख्तने किया क्या हसीं सितम
भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे.
म्हण (शतशब्द्कथा)
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?''
नाही बेटा .
''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?''
बघू .
ती म्हण आहे, म्हण .
''काय म्हणू?'''
अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात.
लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं .
''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?''
तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो.
***
जयाकाकू आलेल्या.
सारखं बोलतच रहातात .
जा जरा पूर्वेकडे (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)
संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जवळजवळ ३५०० वर्षांच्या लिखित इतिहासात अजिबात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नसलेली वर्षे जेमतेम २०० असतील. जसजशी माणसाने भौतिक प्रगती केली, तसतशी प्रगती संघर्षांमध्येही होत गेलेली आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी तर हे सिद्ध केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसांना मारण्यासाठी फार प्रभावीपणे वापर करता येतो. इतर प्राणी गरज असेल तरच दुस-या प्राण्यांची शिकार करतात.
बाबुल मोरा
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेगाना छुटो जाए
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जे बाबुल घर आपना मैं पीया के देश |धृ |
कुंदनलाल सैगल
जगजीत सिंग
पुरुषांना माहेर नाही आणि म्हणून त्यांना त्या हळव्या जखमेचे फार कौतुक नाही असे कुणीसे म्हटले आहे कि नै माहित नै पण असतेच तर बाबुल मोरा हे त्याला दिलेले आर्त उत्तर आहे ...
लखनौतून परागंदा होत असतांना वाजीद अलींनी लिहिलेली हि आर्त रचना भैरवीत
इतनीसी उमर मे ये शौक?
इतनीसी उमरमे ये शौक? गल्ल्यावरचा बनियाने डोळे विस्फारून विचारले ....
झाले असे होते कि छोटा वसंता लाहोरला आपल्या मामांकडे सुट्टीमध्ये म्हणून गेला होता. दिवसभर खेळणे वगैरे करता करता एक दिवस शोध लागला कि जवळच्या मशिदीत एक अवलिया गाण्याचा शौकीन होता आणि स्वत: चीजा बांधत असे ...मग काय वसंता रोज संध्याकाळी वही पेन्सिल घेऊन मशिदीत जाऊ लागला ... इतरांबरोबर तो हि त्या दिवसाची बंदिश लिहून घेई व आनंदाने परत येई ...पण थोड्याशा रितेपणाने ..
एक दिवस संध्याकाळी परत आल्यावर मामांनी विचारले हम्म मग, काय वसंता काय म्हणताहेत तुमचे खांसाहेब ?
मोबाइल रिचार्ज
'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन'
'बरोबर अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?',
'छे हो मी आसे करणारच नाही..',
'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका',
'घाबरू नका काय?
राँग नंबर : अंतीम
रॉंग नंबर : मागील कथानक
तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती.
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं.
अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं.अथ: केस कथा
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते.
मिसळपाव