Skip to main content

रामायण - कथा - सीता ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 07/04/2015 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही. माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.) रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत समावली. आता ही सीता आहे तरी कोण?

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/03/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.

संस्कृत सुभाषिते -२

लेखक शरद यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.

सुखाची परिभाषा - डेसिडेराटा (मॅक्स एह्र्मान)

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 24/03/2015 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी The Real Shine या सुखाचं एक रुप सांगणार्‍या मुक्तकाचं मराठी रुपांतर इथे केलं होतं. आज मॅक्स एह्र्मान याच्या Desiderata (desired things) या भक्तिकाव्यावर आधारित सुखाची दुसरी एक व्याख्या सांगणारं तसंच एक मुक्तक इथे देतो आहे.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

लेखक आतिवास यांनी रविवार, 22/03/2015 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, २, ३, ४, ५ (विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.) भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला

संस्कृत सुभाषिते

लेखक शरद यांनी शनिवार, 21/03/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो. मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ?

देखा एक ख्वाब तो

लेखक कहर यांनी शनिवार, 21/03/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी ३ लाच बाहेर पडलो. कोणालाच न सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते.

मोरूचा मिपासंन्यास...!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/03/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आला. सकाळ झाली . पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे '' लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही . पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …'' '' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/03/2015 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. 1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. 2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.