आस्वाद
हर्षयुक्त उमापती
आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.
मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...
भाग ३
अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..
१८५००ओरिजिनल प्रेम पत्र!
पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला.मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2
मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2
भाग 2 इंदूर – देवास - सारंगपूरअरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...
पान 60 इंदूर ... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?... ... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे.राँग नंबर - भाग ४
रॉंग नंबर : मागील कथानक
“हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ.
नरहरी सोनार हरीचा दास
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.
यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.
कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१
मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.
राँग नंबर - ३
रॉंग नंबर : भाग १ आणि २
****************************************************************************************
“कर्रर्रर्र..क्क्क..क्कच्च्च्च्च्च……
भयाण वेगात आलेली ती झोंडा ’तरन्नुम’च्या दारात येवून कच्चकन थांबली तसा ’तरन्नुम’च्या सिक्युरिटी गार्डने खिशातला रुमाल काढून आधी घाम पुसला आणि मग घाबराघुबरा होत हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून अंतर्भागात डोकावून बघीतले. तसे आतल्या बाजुला उभा असलेला जाफर पटकन अजुन आतल्या भागात पळाला.
असा विचार मनात जन्म-अखेरीही नाही!
याआधी मी वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं या टॉम प्रॅक्स्टन-लिखित गाण्याचं रुपांतर केलं होतं. आज आंतर्जालावर भटकतांना त्याचंच आणखी एक गाणं आवडलं.
The Last Thing on my Mind या Tom Paxton लिखित गाण्याचं हे मुक्त रुपांतरः
जाण उशीराने आली
गेली निसटून रेती
राणी दृष्टीआड गेली,
माझा जीव तिच्या हाती
साधा निरोपही नाही
काही ठेवली ना खूण
खोट प्रेमात माझ्याही
कसे कठोर हे मन
तुला माहिती ना राणी
माझ्या मनाची विराणी?
मिसळपाव