Skip to main content

आस्वाद

चहा .... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
"साला चहा प्यायचा म्हणले की माझ्या अंगावरचे सगळे केस अटेंशनमध्ये उभे राहतात.......!" मी तिसर्‍या वेळेस हे वाक्य उच्चारले तसे सगळे माझ्याकडे डोळे विस्फारुन पाहायला लागले. "हे जोशी पण ने, साला एकदम घोचू हाये! चाय काय घाबरायचा गोष्ट हाये काय? जोशी तू पन ने साला काय पन गोष्टी करते, गपचुप कप उचल अँड खाली करुन टाक तुज्या पोटामंदी. स्टॉप युअर ड्रामा नाऊ! समजला....!" म्हातारा पारशी भडकला! आमचा होरमसजी दारुवाला म्हणजे एक पात्रच आहे! बर्मा फ्रंटवर महापराक्रम गाजवलेल्या या पारशी म्हातार्‍याला चहा म्हणजे जीव की प्राण.

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ... "नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर." मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा).

क्रिसमसची रोषणाई

लेखक जुइ यांनी सोमवार, 19/01/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जसे आपल्याकडे गौरी गणपतीची दुकानांमध्ये आणि घरोघरी धामधुम असते तशीच ईथे (म्हणजे अमेरिकेत) क्रिसमसची धामधुम असते. थॅकंसगिव्हिग डे झाला की क्रिसमच्या विविध सजावटीच्या वस्तू मॉल व दुकानांमध्ये दिसू लागतात. यामध्ये असतात क्रिसमस ट्रीज, कँडीज, रोषणाईच्या दिव्यांच्या माळा व लहान मुलांसाठी क्रिसमस व्हिलेज इत्यादी.

ओडी बारय्या...

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 15/01/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल इंटरनेटवर सर्फिंग करत असतांना यूट्यूबवर एक गाणं मिळालं. कानात आणि मनात रात्रभर भरून राहिलं म्हणून तुमच्याबरोबर शेयर करतोय... कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही. हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय स्टाईलने! थोडीफार पं.

देव तिळीं आला

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 14/01/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.

भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/01/2015 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. ) दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ!

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 11/01/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला.

किशोरी - २०१५

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 11/01/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
किशोरी - २०१४ खरे तर जेमतेम १ वर्षांपूर्वी झालेली भेट त्या स्वरांची ...मी लिहून गेलो कि पुढची भेट कधी ठाऊक नाही ...पण आज पुन्हा भेटले ते स्वर .. आज पार्ले टिळकच्या पटांगणावर सकाळच्या सुखद थंडीत तानपुरे सुरु झाले ... स्टेजवरचे दिवे मालवायला लावले आणि कसलीही नोमतोम वगैरे नं करता माफक आलापीनंतर तोडी सुरु ...

लोकमान्य - एक युगपुरुष

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 05/01/2015 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.