Skip to main content

दुःख

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 15/09/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
'देवा मी काही चुकलो असेल तर मला माफ कर,' असे राजू परमेश्वरा कडे रोज प्रार्थना करीत पण परमेश्वर काही त्याला  पावत नव्हता. आज त्याचे शिक्षण पुर्ण झाले असले तरी तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता , राजू  लहान असतानाच त्याचे वडील मरण पावले ,मग त्याची आई बाहेर घरची कामे करून त्याला व दिपा ला लहानाचे मोठे केले व शाळा शिकवले. पण आता त्याची आई थकलेले होती , घर चालण्यास पुरेसे पैसे मिळत नव्हते , लवकरच दिपा च लग्न करायचे होते, आशा अनेक समस्यांशी तो लढत होता.पण त्याला जाॅब मिळत नव्हता , तो या अपयशाने  खचून जात होता, शेवटी तो परमेश्वरा ला दोष देत.

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

चाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/09/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

Silence used to grow around him....

लेखक मारवा यांनी सोमवार, 07/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
1 कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. 

१. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) 

२. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)