Skip to main content

दिवाकरांच्या नाट्यछटा

लेखक खेडूत यांनी बुधवार, 30/09/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं . मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

लेखक राजू यांनी बुधवार, 30/09/2015 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते. पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते. कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया. कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो. का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध? का. 2- तसं नाय ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय. का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय का.

सनसेट बुलेव्हार्ड

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 28/09/2015 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
सनसेट बुलेव्हार्ड नुकतेच रॅंडम वेब पेजेस्‌ सर्च करत असताना एक लिंक हाती लागली. ’ २४ मूव्हीज्‌ विथ ग्रेट ओपनिंग सीन्स’ ही लिंक हाताला लागली आणि सहज चाळत असताना ’सनसेट बुलेव्हार्ड’ चे नाव समोर आले आणि सर्र्क्कन अंगावर काटा आला. मी कित्येक लोकांना ’कुठले चित्रपट पाहू?’ हा प्रश्न विचारला नसतानादेखील मी ह्या चित्रपटाचे नाव सुचवले आहे. मला खुद्द शिरीष कणेकरांच्या ’बिली वाईल्डर’ बद्दल लिहिलेल्या ’एकमेवाद्वितीय’ ह्या लेखामुळे ह्या चित्रपटाचे नाव कळाले. दिग्दर्शकाचे नाव कळाले.

निरोप दे आता

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 28/09/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी मी मला आवडलेल्या काही इंग्लिश कवितांच्या/ गीतांच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न केले होते.

स्क्रिन शॉट भाग -५

लेखक राजू यांनी रविवार, 27/09/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला..... " शक्यच नाही ?" पुढे चालु....
स्क्रिन शॉट भाग -५ "शक्यच नाही ? " जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते.

शितोळे (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी रविवार, 27/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
''कुठे चालले ? सातारा का?'' ''नाई सांगलीला'' . ''अरे वा ! मी पण !'' 'त्यात काय अरे वा ?' बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले . ''तुम्हाला प्रवासात झोप येते? '' ''हं '' ''बरंय बाबा !'' शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता. जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही. भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते . ''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !

स्क्रिन शॉट भाग -४

लेखक राजू यांनी शनिवार, 26/09/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....
स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता.

शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 26/09/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl (ऋग्वेद १/१६४/४६) [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि]. आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे.

स्क्रिन शॉट भाग - ३

लेखक राजू यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद