चंदाची प्रेम कहाणी
चंदाचे ऑफिस नवी दिल्लीत कश्मीर हाउसच्या जवळ होते. चंदाला चांगलेच आठवते, तो शुक्रवारचा दिवस होता. त्याचाच कार्यालायातली ती म्हणजे चांदनी पहिल्यांदाच त्याच्या केबिन मध्ये त्याला भेटायला आली. चांदनीला ऑफिसमध्ये सर्व ऐश्वर्या राय म्हणायचे, मध्यम बांधा, गोरा रंग, मोठे डोळे, सोनेरी लांबसडक केस आणि माधुरी दीक्षित टाईप कोलगेट स्माईल. कोण फिदा नाही होणार तिच्यावर. त्याच्या सारखे कित्येक तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करायचे. पण ती कुणालाच भाव द्यायची नाही. तिला पाहताच चंदाच्या हृदयाचे ठोक वाढले. त्याच्या तोंडून एवढेच निघाले, काय सेवा करू आपली.
मिसळपाव