मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'

माहितगार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे. पण मराठी विकिपीडियाच्या बर्‍याच वाचकांना विकि प्रकल्पांच्या परिघाची नेमकी जाण नसते आणि म्हणूनच मराठी विकिपीडियाच्या चर्चा:मुंबई पानावर एका मागून एक मुंबई विषयी गाणी दाखल होण्याचा अंदाज दिसतो आहे. सी आई डी (C.I.D.) चित्रपटात गायक - मोहम्मद रफ़ी गातात ऐ दिल है मुशकिल जीना यहाँ ज़रा हट के ज़रा बच के ये है बम्बई मेरी जान - कवी = ? लावणीकार पठ्ठे बापुराव त्यांच्या लावणीत म्हणतात मुंबई ग नगरी सदा तरनी व्यापार चाले मनभरुनी दर्याच्या गो वरुनी वरुनी जहाजे फिरती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचीही लावणी आहे मुंबईत उंचावरी मलबार हिल चंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती परळात राहणारे रातदिस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गाळती //धृ // बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर यांची मुंबईबद्दलची कविता अशी न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती ..... मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानावरील अनाम लेखक/लेखिकाच्या मते बा. सी. मर्ढेकरांची ही मुंबईवरील कविता शालेय अभ्यासक्रमात कधीतरी होती (बहुतेक ९वी \ १० वी). 'पिपांत मेले'सारख्या दुर्बोध कविता लिहिणारे मर्ढेकर आणि अशी विलक्षण जिवंत कविता लिहिणारे मर्ढेकर हे दोन वेगवेगळे कवी वाटावेत इतक्या या कविता भिन्न आहेत. अर्थात मराठी विकिपीडियावर या विषयावर साहित्यिक आस्वादात्मक चर्चा अधिक रंगण्याच्या आधी कॉपीराईट फ्री साहित्य मराठी विकिस्रोतावर स्थानांतरीत करणे, कॉपीराइटॅड काव्य वगळणे असे ज्ञानकोशातील संपादकीय क्रौर्य दाखवून ही साहित्य मराठी विकिपीडिया चर्चा पानावरुन केव्हातरी अलगद उडवली जाईल. अर्थात त्याच वेळी मिसळपाव आणि अन्य संस्थळांवर याच विषयावर चर्चा आणि लेखन झाले तर त्या बद्दल मराठी विकिपीडियावर येथे यणार्‍या माहितीची दखल घेऊन लेख निश्चीत लिहिता येईल.(येथील प्रतिसादांचा संदर्भ घेऊन मराठी विकिपीडियावर सुरु केलेला नवा लेख [[काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई]] येणे उद्देशाने आमच्या धाग्याच्या माहितीत अधिक भर घालणेसाठी सर्व मुंबई प्रेमी मराठी रसिक वाचक लेखकांना सप्रतिसाद आमंत्रण आहे. आपले स्वतःचे या लेखासाठीचे प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकतात म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. प्रतिसादांसाठी आभार

वाचन 8666 प्रतिक्रिया 0