तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची
आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपले कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो....
एके काळी इक्वाषु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते.
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा)
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!!
=====
त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच.
सरिंवर सरी आल्या ग...
कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो.
तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली.
स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा
सिंहासनावर विराजमान अवंती नरेश विक्रमादित्यचे डोके भडकलेले होते, ते रागाने राजसभेत बसलेल्या सभासदांवर डाफरत होते, आज सकाळी राजवाड्या बाहेर फिरायला गेलो होतो. सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला. नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला, आता असे चालणार नाही. काही ही करा मला पुन्हा कधी नगरीत घाण दिसता कामा नये. पण एक लक्ष्यात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे.
आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व !
**************************************************************************
लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.
जो ज़िंदा हो तो फिर....
मराठी साहित्याला कुठेही कमी न लेखता म्हणेन, की उर्दू शायरी किंवा एकंदरितच उर्दू साहित्य वाचताना एक अवर्णनीय भारदस्तपणा सतत जाणवत रहातो. शब्दांचा भारदस्तपणा, अर्थाचा भारदस्तपणा, रचनेचा आणि वाचनानुभवाचा. उसकी बात अलग है. बिलकुल अलग. किसी दूसरी भाषा में इसे बयां तो किया जा सकता है, पर महसूस नही किया जा सकता. तरीही, मिपावर आतापर्यंत तीन चार ग़ज़ल अर्थासहित, रसग्रहणासह पोस्ट झाल्या, तो सिलसिला चालू ठेवत उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका ता-याची ही एक जरा वेगळी पण मला भावलेली ग़ज़ल तुमच्यासोबत वाचतोय.
हा शायर म्हणजे वसीम बरेलवी. गावाच्या नावावरून आडनावं पडलेली उदाहरणं अनेक आहेत. त्यापैकीच हे एक.
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )
भाग ३ (अंतिम )
भाग १
भाग २
२०१५
आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.
सिनेमे पाहायचेत.
सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही..
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २
भाग १
२०००
मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.
मिसळपाव