बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच.
१. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ)
प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.