मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

बॉलिवूडचे बाप

महासंग्राम ·
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच. १. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ) प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.

साहिब बिवी और गुलाम

महासंग्राम ·
लहानपणी दूरदर्शन वर दुपारी 12 वाजता जुने चित्रपट लागायचे, तेव्हा एका रविवारी गुरुदत्त फिल्म फेस्टिवल सुरु असतांना, एका नितांत सुंदर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट लागला होता, 'साहीब बिवी और गुलाम'. गुरुदत्तची निर्मिती आणि त्याचा जवळचा मित्र अब्रार अल्वी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मनात अजून घर करून आहे, तो मिनाकुमारीच्या सौंदर्यामुळे.

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

इरामयी ·
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का?

मगं ! आज काय वाचताय ?

धर्मराजमुटके ·
नमस्कार, आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे. तर मग ! आज काय वाचलं ?  पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी मराठी अनुवाद : सायली गोडसे प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त ---------------- द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे.

Rolls Royce

अविनाशकुलकर्णी ·
.. ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात.. ७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो. ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत. गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक

Rolls Royce

अविनाशकुलकर्णी ·
.. ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात.. ७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो. ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत. गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4

nishapari ·
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821 सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ... भयपटांमध्ये बऱ्याच वेळा नुसतं दचकावून वगैरे घाबरवण्याच्या तंत्राचा वापर केलेला असतो .. कॅरॅक्टर डेव्हलपमेंटला त्यात फारसं महत्व नसतं . या सिरिअल मधली अनेक पात्रं प्रेक्षकांच्या अगदी आवडीची बनून जातात ....

दर्पण

अविनाशकुलकर्णी ·
.......... गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली. नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची.. त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता. त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता.. बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता..

प्रतिशोध -एक भयकथा

अविनाशकुलकर्णी ·
माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी अतुल -अजय दोन मुले अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात अतुल सासुरवाडीलाच राहात असतो माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून फ्लॅट्स बांधले असतात जानकीस विवाह मंजूर नसतो ती जुन्या वळणाची असते गोत्र शाखा आदी बघून

यमदूत

अविनाशकुलकर्णी ·
हाय -कुणीतरी त्याला म्हणाले त्याने मागे वळून पाहिले पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे हे ऐकताच त्याला घाम फुटला मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ? तर तुला एक जीवदान मिळेल समजा मी पळून गेलो तर ? तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे तो अंतर्धान पावला जनरल स्टोर मध्ये माल देणे पैसे मोजणे त्याने चालू ठेवली तेव्हढ्या