माझी पाखरे
गडबड वेड्या वस्तीमध्ये
शाळा पाखरांची
पोपट मैना आणि कबुतर
लगबग चिमण्यांची
डेरदार त्या वृक्षावरती
घर आणिक शाळा
सकाळ सायंकाळी भरतो
प्क्ष्यांचा मेळा
कावळा मास्तर शाळेमध्ये
पोर चिमणा-चिमणी
कावळा शिकवी धडे-कविता
मुले गाती गाणी
किलबिल किलबिल किती तयांची
आसमंत दाट्तो
मैना गाइ सुरेल गाणे
पोपट तो नाचतो
अवतीभवती मनुष्यप्राणी
लोभी हलकट
मारामारी आणि भांडणे
नुसता हवरट
स्वार्थापायी या अधमाने
कुर्हाड हो आणलि
घर आणिक शाळा त्यांची
झरझर हो तोडली
घिरट्या घालीत होते पक्षी
घर हरवले कोठे
आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या
आसमंत दाटे
किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
कॅमेरा निकॉन कूलपिक्स एस ४. १०पट झूमचा.
पक्षी फार लांब असल्याने चित्र स्पष्ट असले तरी आकाराने लहान झाले आहे.
फोकल लेंग्थ ६३ मी मी
ऍपरचर १/४
शटर १/१७०
आयएसओ ५०
पक्षी थ्रश या प्रकारातील असावा असे वाटते. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे.
-- (पक्षीमित्र) लिखाळ.
पारंपारीक गणपती-गौरी उत्सवाचं हे चित्र .सिंहासनावर विराजमान गणपती. बाजूला गौरी.कालच गौरींचं आगमन झालेलं आहे.
आज गौरी भोजनाचा थाट आहे.सोळा भाज्या कोशिंबिरी,पहाटे लवकर ऊठून काकूंनी तयारी केलेली दिसतेय.आरती सुरु आहे.सुखकर्ता दुखहर्ता... .फार शिस्तीत आरती होणार आहे.