प्रतिबिंब
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते
वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी
हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
वाचने
4304
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
तु खरी
पुन्हा एकदा मस्त कवितेची मेजवाणी .
In reply to पुन्हा एकदा मस्त कवितेची मेजवाणी . by शितल
अगदी अगदी
क्लास..
मस्त
बापरे
In reply to बापरे by आनंदयात्री
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आई गं!! कसलं
वेदनेचा
चांगली, पण
सुंदर..
क्या बात है!
खरंतर...