एकाच चालीची बंगाली आणि हिंदी गाणी
तात्यांनी पुरवलेल्या मुखपृष्ठावरच्या सलील चौधरींच्या आणि लतादीदींच्या गाण्यावरून आठवलं की बंगाली आणि हिंदी या भाषाभगिनींमध्ये अशी देवाणघेवाण बरेचदा झालीय, इथे मी फक्त बंगाली ते हिंदी असा प्रवास केलेली (आणि प्रामुख्याने सलीलदांची) काही गाणी देतोय, त्यांत लताखेरीज इतरही गायक आहेत (इथे रफीचं आणि मुकेशचं एक-एक उदाहरण दिलंय, किशोरकुमारनेही अर्थात् बरीच गाणी गायलीत). ही गाणी गोळा करतांना हे जाणवलं की बरेचदा मूळ बंगाली गाण्यांतील शब्दांशी त्यांच्या हिंदी-करणातही ईमान राखलं गेलंय, तर काही वेळा (चित्रपटातील प्रसंगाशी अनुरूप म्हणून असतील, पण) वेगळीच भावना घेऊन हिंदी गाणी समोर येतात. दोन्ही प्रकारच्या रुपांतरात गीतकारांचं खरंच कौतूक केलं पाहिजे इतके चपखल शब्द्प्रयोग आढळतात. म्हणून मी त्यांचीही नांवं द्यायचा प्रयत्न केलाय.
अर्थात्, ही केवळ झलक आहे. तुम्हालाही अशी बरीच गाणी माहीत असतील, त्यांची जरूर माहिती द्या. (Off the top of my head, अमर प्रेम, अमानुष, आनंदाश्रम, असे काही चित्रपट आठवतात.)
१. आमी चोलते चोलते थेमे गेचे (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि कईं बार युंही देखा है (मुकेश, रजनीगंधा चित्रपटात, सलील चौधरींच्याच संगीत निर्देशनात, कलाकारः विद्या सिन्हा, दिनेश ठाकुर)
२. जा रे जा रे उड जा रे पाखी (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि जा रे जा रे उड जा रे पंछी (लता, माया चित्रपटात, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात,कलाकारः माला सिन्हा, देव आनंद)
३. ना, मोनो लागे ना (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि ना, जिया लागे ना (आनंद चित्रपटात, गीतकार गुलझार, संगीतकार सलील चौधरी, कलाकारः सुमीता संन्याल, अमिताभ बच्चन)
४. निशीदिन, निशीदिन, बाजे शोरोणर बीन (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन ऐसी बतिया बनाये हां (अन्नदाता चित्रपटात, गीतकार योगेश, संगीतकार सलील चौधरी, कलाकारः जया भादुरी, अनिल धवन) [हे अफलातून उडत्या चालीचं गाणं मी इतकी वर्षं विसरूनच गेलो होतो! आज पुन्हा ते सापडल्यावर मनापासून आनंद झाला.]
५. आकाश केनो डाके (किशोर कुमार, संगीतकार एस. डी बर्मन?) आणि ये शाम मस्तानी, मदहोश किये जाए (किशोर कुमार, कटी पतंग चित्रपटात, गीतः आनंद बक्षी, संगीतः आर डी बर्मन, कलाकारः राजेश खन्ना, आशा पारेख)
६. जोडी किछु अमारे सुधाओ (आधी श्यामल मित्रा यांनी आणि नंतर महंमद रफी यांनी सलील चौधरी यांच्या संगीत निर्देशनात गायलेलं) आणि दिल तडपे तडपाये (महंमद रफी, पूनम की रात चित्रपटासाठी, गीतकारः शैलेन्द्र, संगीतकारः सलील चौधरी, कलाकारः कुमुद छुगानी, मनोज कुमार)
७. ए बाशी केनो गाये (लता, चित्रपट?, संगीतकारः सलील चौधरी) आणि ये बन्सी क्युं गाये (लता, परख चित्रपटासाठी, संगीतकारः सलील चौधरी, कलाकारः साधना?)
याद्या
6452
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेमन्त
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
हेमन्त
छू कर मेरे
वा, वा, नंदनराव!!
छान धागा
'तुम बिन जाउं कहां ' रफीप्रमाणे किशोरनेही म्हंटलंय..
In reply to छान धागा by प्रदीप
ना जाने
सुरेल धागा.
सबिता चौधुरींनी सलिलदांच्या निर्देशनात
In reply to सुरेल धागा. by क्रान्ति
खाई है रे
आणखी काही बंगाली गाणी
खूपच छान
धन्यवाद, मंडळी! Keep them coming:-)
हो, विचार
In reply to धन्यवाद, मंडळी! Keep them coming:-) by बहुगुणी
चांगलेच संकलन!
आणखी दोन
आमार
In reply to आणखी दोन by फारएन्ड
आमाय प्रोश्नो कोरे नील ध्रुबो तारा
In reply to आमार by विसोबा खेचर
धन्यवाद... त
In reply to आमाय प्रोश्नो कोरे नील ध्रुबो तारा by बहुगुणी
श्यामल मित्रा आणि सलील दा
एई रात तोमार आमार - ये नयन डरे डरे
'मन माझे चपळ न राहे निश्चळ'