Skip to main content

आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)

लेखक टारझन यांनी रविवार, 04/04/2010 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम्स लोक्स , उन्हाळ्यातली दुपारची वेळ म्हणजे अंमळ सुस्तावणारी असते , पण आता दुपारीच उठलो असल्यानं पुन्हा सुस्तीही येत नाही. फार दिवसांपासुन एक विचार मनात घोळत होता.. तसे आम्ही सुपर कार्स आणि सुपर बाईक्स चे दिवाने .. आपल्या मिपाकरांच्या क्यारॅक्टर ला सुट होणारी कार कोणती असेल ? असा विचार चाटुन गेला आणि मग हे ... तुर्त तरी फक्त निवडक क्यारॅक्टर्स चा विचार केल्या गेला आहे पिवळा डांबिस : यांची कार असेल "लेक्सस आरेक्स३५० ". लेक्सस चं नावंच पुरेसं आहे. एखाद्या गर्भश्रीमंताचंच काम ! एकदम स्टायलिश , आरामदायक आणि सुंदर इंटेरियर.

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - १ --
किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .
एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील.
गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले.

मनातला मोगरा

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यातील सायंकाळी शीतल वार्‍याच्या झुळुकेच्या प्रतीक्षेत असावं आणि कोपर्‍यावरून ती हवीहवीशी वाटणारी हाळी यावी.....''मोगरा आला मोगरा , ताजा ताजा मोगरा.....'' नकळत श्वास आता कधीही तो मदमस्त करणारा मनमोहक सुगंध लडिवाळपणे साद घालेल या विचारानेच अलवार होतो ....

निश्चयाचा महामेरु - शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 30/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज. आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली.

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

जलते है जिसके लिए

लेखक अरुंधती यांनी रविवार, 28/03/2010 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं हसणं, तिच्या चेहर्‍यावर उमटणार्‍या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं. नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्‍या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला.

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'. 'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो. नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो.