नांदुरमधमेश्वर ची भटकंती
एकदाची २४ जानेवारी २०१० ची दुपार उजाडली. गाडी काढली आणि निघालो नासिकला एकटाच. खुप दिवस ठरत होत पण योग जुळत न्हवता. कधी हवामाना मुळे आलेल मळभ तर कधी रजेचा प्राब्लेम. या वेळेस मी ठरवल होत ग्रुपमधल कुणी बरोबर येओ अथवा राहो मी जाणारच. नांदुरमधमेश्वर नासिक पासुन साधारण ३०/३५ कि.मी वर आहे. येथे खुप जुना (ब्रिटीश कालीन असावा) मातीचा मोठ्ठा डॅम आहे. या डॅमच्या बॅक वाटर मधे चरण्यासाठी खुप लांबुन आणि परदेशातुन सुध्दा खुप पाणपक्षी येतात असे समजले होत आणि त्यांना (कॅमे-यात) शुट करण्यासाठी मी चालालो होतो.
शनिवारचा हापडे टाकला होता. सॅक, कॅमेरा व ईतर साहीत्य आद्ल्या दिवशीच भरुन ठेवल होतं.घरी आलो माझे भटकंतीदर्म्यानचे रगडायचे कपडे चढवले आणि इंडीकाला सेल्फ मारुन प्रवास चालु केला. नासिकला पोचल्यावर तीथे माझा (पत्रकार) मीत्र प्रविण खरे रीसीव्ह करायाला येणार होता.(पुढचा प्लॅन चाणाक्ष मंडळींनी ओळ्खलाच असेल.:-))
जाताना घाटातुनच फोटो काढायला सुरुवात केली. हे काही सुर्यास्ताचे फोटोज
रात्री ८ वाजता नासिकला पोचलो.तीथे मला भेटायला आपला पाषाणभेद आला होता. जवळपास २/४ महीने तो सारखा बोलवत होता. आम्ही फोनवर देखिल खुप वेळा बोललो होता,मेल आणि खरडी मधुन गप्पा होत होत्या पण समक्ष भेट आणि ओळख त्या दिवशीच झाली. काही लोक म्हणतात की ही इंटरनेट वरची ओळख खरी नसते. हे सगळ व्हर्चुअलरीअॅलीटी आहे. असेलही कदाचीत पण आपली virtue पक्की असली तर मग मला वाटत सगळी reality आहे. (आपण मोकळे पणाने वागलो तर फार क्वचीत समोरचा आडकाठी बाळगतो असा माझा आनुभव आहे) नाहीतर काय गरज होती त्या दगडफोड्याला तडामडत, जबर थंडीत मला भेटायाल यायची? असो प्रविणची आणि त्याची ओळ्ख झाली. गप्पा जरा कोरड्या वाटल्या म्हणुन आम्ही त्याला घसा ओला करण्याविषयी विचारल ;-)पण त्याला नाइट शिफ्ट असल्याने तो लवकर पळाला. खुप वर्षांनी प्रविण भेटला होता. एकतर जबर थंडी होती त्यामुळे प्रत्येकी १,२, करत ४ पेग कधी संपले कळलच नाही अजुन त्याच्या घरी जाउन कोंबडीवर हात मारायचा होता.मस्त गरम रस्सा आणि ज्वारीची भाकरी हाणुन १/१.३० वाजता झोपलो.
पहाटे ५ वा. उठुन पटापट दोघांनी आवरल (थंडी + व्यवस्थीत जेवण या मुळे रात्रीचा अंमल काही जाणवला नाही) वाटेत प्रविणच्या एका कार्यालयीन मित्राला गाडीत घेतला आणि नांदुरमधमेश्वरचा प्रवस चालु झाला. खुप खुप थंडी आणि धुक्यात (सोन)सकाळ अशी होती.
वरच्या फोटोवर फोटोशाप मधुन केलेले काही प्रयोग इथे खाली..
पक्षी काही दिसेनात म्हणुन लेन्सबदलुन काही मॅक्रो फोटोग्राफीच्या प्रयोगांना सुरवात केली.
रुइची फुल...
या (मासेमारी) मावशी कडुन कळल की डॅम फुटुन पाणी वाहुन गेल आहे(ओ डेम इट) :-( आणि सगळीकडे कमरे येवढा गाळ आहे. पक्षी भरपुर होते पण गाळ अस्ल्या मुळे तिथ पर्यंत जाता आल नाही.
मग टाईमपास म्हणुन .....
पक्षी निरीक्षणासाठी उभारलेला टावर
माझ्यासारखा वेडाराघु
बिनदाढीचा प्रविण आणि त्याचा मित्र
मावळत्या दिनकरा अर्ध्य तुजला जोडुनी दिन्ही करा
पक्षी न दिसता देखिल हा प्रयोग फसला नाही कारण तीथल्या लोकल गाईडचा फोन नं मी मिळवला असुन त्याने पुढच्या फेरीत त्या धरणाच्या काठाशीच तंबुत राहण्याची (व्हेज/ नानव्हेज)जेवणासहीत व्यवस्था करुन देण्याच अश्वासन दिल आहे. पुढील भागात भिगवणचा फेरफटका मारुयात :-)

वर्गीकरण
अपूर्ण!
In reply to अपूर्ण! by प्रमोद देव
+१
तसे सगळेच
खतरनाक...!!!
अप्रतीम
जयपालजी
फोटोंच्या
In reply to फोटोंच्या by प्राजु
+१
व्वा!!
सर्व