Skip to main content

फ....फ....फ....फ्लोरिडा

फ....फ....फ....फ्लोरिडा

Published on 24/09/2010 - 19:36 प्रकाशित मुखपृष्ठ
दोन-तीन विकांतापुर्वी फ्लोरिडाला जाण्याचा योग आला.. त्यातले काही निवडक फोटू खाली देत आहे. १. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त २. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त ३. सेंट पीट्स बीच ४. सेंट पीट्स बीच ५. सेंट पीट्स बीच ६. किनार्‍यावर एक युगुल बसलेलं होतं...त्यांचा silhouette घेण्याचा प्रयत्न
लेखनप्रकार

याद्या 7617
प्रतिक्रिया 59
३ आणि ४ नंबरचे फोटु +१ !!! लै लै भारी. बाकी ६ नंबरच्या फोटुतला बाबा शेवटच्या फोटुत एकलाच दिसतोय... अबाबाबा..बुडवलं का काय तिला ?? ( कि तिने बुडवलं ? )

In reply to by मितान

६ आणि ७ नंबरचे फोटु +२ !!! लै लै भारी. बाकी ६ नंबरच्या फोटुतली बाई शेवटच्या फोटुत एकलीच दिसतेय... अबाबाबा.. प्रभ्या, बुडवलं का काय त्याला ?? जोवरी दिसती सौंदर्यतराणे ; फोटो काढणे सोडायाचे नाही !

समुद्र फ्लोरिडाला बघा नाहीतर तारकर्लीला बघा. तेवढाच छान दिसतो. फोटो मस्त!!!

काय राव! सहा नंबरचा फोटो जरा पाण्यात उतरून समोरून घेतला असता तर काय बुडाला असता काय? बाकी फोटो छान!

सगळे फोटू छान आलेत. मितानच्या मनात जे प्रश्न आले तेच माझ्या मनात आल्याशिवाय राहिले नाहीत.;) आणि अश्या बीचचे फोटू कोण पाहणार रे? आँ? मनुष्यप्राण्यांनी फुलून गेलेले समुद्रकिनारे आवडणारेच जास्त!;)

In reply to by रेवती

मनुष्यप्राण्यांनी 'नैसर्गिकरित्या' फुलून गेलेले बीच असं म्हणायचंय रेवतीतैला ! ;) पण तसे फोटो उन्हातच चांगले येतात नै प्रभ्या ? उन्हातले फोटो वितळले की काय ???

In reply to by प्रभो

प्रभ्या लेका, त्या वाक्यात फ्लोरिडात कधीपण पाऊस पडतो हे टाकायचं राहिलं :) >>लै भारी वाट्टंय तिथे गेल्यावर... हेहेहेहेहे :)

In reply to by स्वप्निल..

हे मात्र खरं लेका......३ दिवस गेलो अन त्यातल्या एका दुपारी चक्क चक्क वादळी पाऊस....... >लै भारी वाट्टंय तिथे गेल्यावर... हे आमच्या सारख्यांसाठी...फ्लोरिडा नेटीव्हस ना नाही.. ;)

शॉल्लेट फोटु रे प्रभ्या. पण्ण.....प्रायव्हेट सर्क्युलेशनातल्या फोटुंची अंमळ मौज ह्यात नाही बा. ;) (पळा...हाणतंय आता प्रभ्या.)

प्रभो मस्त रे....! सर्वच फोटो लंबर वन आहेत. -दिलीप बिरुटे

पण फ्लोरिडाच्या बीचवर जायचं आणि असे फोटू टाकायचे म्हणजे एफसी रोडवर हिंडताना फक्त ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेण्यासारखे झाले! ;) अवांतर - समुद्र आणि असले सूर्यास्त म्हणजे छ्या....वर्णन करण्यात अर्थ नाही जायलाच हवे! (समुद्रप्रेमी)चतुरंग

In reply to by चतुरंग

याच जाऊन.... फ्लोरिडात घडलेला एक किस्सा... समुद्रात डुंबून कंटाळा आल्यावर जलतरणतलावात पहुडळो होतो. एक ६-७ वर्षाचा लहान मुलगा त्याच्या बाबासोबत जलतरणतलावात होता....त्याला अजून थोडा वेळ पोहायचं होतं तर बाबा ला कंटाळा आलेला... बाबा नाही म्हणाल्यावर पोराने ठोकली बोंब.. ' if you don't want to swim with me....okey...but next time don't come to me...saying "don't tell this to mom" ' ....... आम्ही सगळे तलावातच लोळतोय.... =)) =)) =))

In reply to by धमाल मुलगा

पोट्टं अजूनच वस्ताद निघालं..बापासोबत परत जाउन धा मिन्टानी आईला घेउन आलं..आणी तासभर पोहलं...आता आईला काय सांगितलं ते, तो आणी त्याची आई जाणे.. :)

४ नंबरचा फोटो आवडला. पार जमीनी पासुन क्षितीजापर्यंत ते वर आकाशात! आणि हो, आता त्या समुद्रकिनार्‍यावरच्या दुसर्‍या कॅटेगरीच्या फोटोची लिंक व्यनि ने पाठवणे.

दोन तीन वीकांतापूर्वीही तिथे ऑईल लीकचा मागमूसही नव्हता आणि आता तेथे सर्व काही आलबेल आहे, हे बघून आनंद झाला. (तेथील टार बॉल्सचे वगैरे फोटो पाहिले होते, त्याविषयी पेपरात वाचले होते-- का हा तो बीच नाही?)

In reply to by प्रदीप

टार बॉल्स नव्हते.. ते सर्व बघूनच गेलो होतो...तसेच आमच्या हॉटेलने समुद्रात तेलाचा मागमूस सापडला तर २ रात्रीचं बील परत देण्यारी पण दाखवली होती... :)

सगळेच फोटो मस्त. तो आग लागल्या सारखा म्हटलेला मला जास्त आवडला.

प्रतिक्रीया :- १) लै भारी रे प्रभ्या ! फोटु हैक्लास. सहा नंबरचा फोटु घ्यायची दिशा चुकीची. २) समुद्र सगळीकडे एकसारखा दिसतो ह्या मताशी असहमत ! तो समुद्र आहे सरदार नाही. ३) स्वतःच्या धाग्याचा आपला खरडफळा करायचा आणि त्यायोगे प्रतिसाद संख्या वाढवुन धागा सतत वर आणण्याचा प्रयत्न बघुन आपल्याला ह्यापुढे 'प्राचि' अथवा 'प्रभुभाऊ' असे सदस्यनाम द्यावे असा ठराव मी मांडत आहे. ४) आपण लोकाच्या पैशाने देशाबाहेर कामधंदे करायला गेला आहात का बोंबलत हिंडत बाया बायकांचे फोटु काढायला गेला आहात ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

समुद्र सगळीकडे एकसारखा दिसतो ह्या मताशी असहमत ! तो समुद्र आहे सरदार नाही
ओ भौ, "एकसारखा" नै कै, "तेवढाच छान" दिसतो म्हटलं मी! याच्याशी तुम्ही असहमत असलात तर आपलं काय म्हणणं नाय! पण "सरदारजी" बद्दल आपुन तुमच्याबरोबर बाडिस.

मस्त आलेत सगळे फोटो. अप्रतिम! तिसरा खुपच मस्त!

समुद्रकिनार्‍याचे मस्त फोटोज