Skip to main content

प्रेम......................

प्रेम......................

Published on 21/09/2010 - 11:57 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेम म्हणजे काय? आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? प्रेम म्हणजे काय? एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो? अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे? प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत? ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस. तुझा आवाज सुंदर आहे. तू अतिशय काळजी घेणारी आहेस. तू अतिशय प्रेमळ आहेस तू विचारी आहेस. तुझे हास्य मोहक आहे. तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते. प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा. प्रिये, तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो. पण आता तू बोलू शकतेस का? नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो. पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच.... मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय. थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे. खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता. आणि शेवटी.... ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.

याद्या 3027
प्रतिक्रिया 13
हा पुपेंचा डुप्लीकेट आयडी आहे की काय? हा कुठलाही डुप्लीकेट आयडी नाही. मी उत्कर्ष , सध्या पुणेकर आहे. मिसळपाववर वाचक बनुन असतो. जेव्हा गरज असेल तेव्हा लॉगिन करतो. बाकी पु.पे. शी साधर्म्य आढळल्यास फक्त योगायोग समजावा.........

मेवेशी बाडिस!

माझी सदैव बरोबर असलेली अपूर्णता कोणत्या तरी अज्ञात, अनाकलनीय पातळीवर भरून निघाल्याची सुखद जाणीव मला त्याव्यक्तीच्या सहवासात होते म्हणून मी त्या व्यक्तीवर प्रेम करते. कुठे कोणतं जिगसॉ पझल जुळतं माहीत नाही पण मला पूर्ण झाल्याची सुखद अनुभूती तिच्या सहवासात मिळते जी की नंतरही रेंगळत रहाते, माझ्या आत्म्याला चंदनाच्या सुगंधाप्रमाणे , शीतल पोर्णीमेच्या चांदण्याप्रमाणे वेढून रहाते म्हणून मी त्याच्यावर प्रेम करते. एम एल टी आर चं पुढील गाणं खूप सुंदर आहे - Paint my love You should paint my love It’s the picture of a thousand sunsets It’s the freedom of a thousand doves Baby you should paint my love

प्रेम म्हणजे कुठल्यातरी एंझाईमस्चा केमीकल लोचा... (प्रेमी) अर्धवटराव

माणसावर प्रेम करण्यापेक्षा इंटरनेट वर करावं, अंमळ स्वस्त पडते. भारतीय रुपये १२०० फक्त प्रतिमाह अमर्यादित वापर १ एमबी/एस स्पीड. (पुर्वीचा इंटरनेटप्रेमी - इंटरनेटवर प्रेम असलेला)

माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत? मुली आणि त्यांचे बॉयफ्रेंड !!! हे प्रकरण मला काही केल्या समजत नाही. आपल्या बॉयफ्रेंडच्या पराक्रमाच्या कथा सांगताना मुलींच्या चेहर्‍यावर अगदी ऑस्कर अवॉर्ड मिळाल्याचा आनंद मिळावा तसा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो...(हे माझं निरिक्षण...;) ) एकमेकींशी बोलतना खिंदळुन हसतात काय...एकमेकांना टाळ्या काय देतील... सगळचं कसं... !!! ;) वरचा लेख मला ढकलपत्रातुन आलेल्या लेखात कुठेतरी वाचल्या सारखे वाटते...पण नक्की सांगता येत नाही... प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता सहमत...