Skip to main content

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

लेखक मितान यांनी बुधवार, 27/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ? पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात. " मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार " " मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? " " वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते.

गुरुचरित्रामधील ४ युगांचे स्वरूपवर्णन

लेखक शुचि यांनी बुधवार, 27/10/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुचरित्राच्या दुसर्‍या अध्यायामध्ये ४ युगांचे अतिशय काव्यमय आणि बोलके वर्णन येते. जेव्हा विष्णू ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची आज्ञा करतात तेव्हा स्थावरजंगम्,स्वेदज, जारज, अंडज आदिंची उत्पत्ती केल्यानंतर ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करतात, आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात. कृत (सत्य), त्रेता, द्वापार आणि कली या युगांना एकेक करून बोलावणं धाडण्यात येतं. ही कथा गुरुचरित्रात अतिशय रसाळतेने वर्णन केलेली आहे आणि मूळातूनच वाचण्यासारखी आहे. तिचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे. सर्वात प्रथम पाळी कृतयुगाची.

मी मज हरपुन बसले गं ...

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/10/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते. अनूप जलोटा यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते. आज लिहितोय ते मराठी मधील '' मी मज हरपून बसले ग '' या बद्द्ल.

केनू संग खेलू होली...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/10/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
केनू संग खेलू होली.. (येथे ऐका) यमनचे स्वर, दीदीचा शांत स्वर. यमनच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रूप. राग यमन..! सार्‍या विश्वाला कवेत घेणारा, एकत्र बांधणारा.. राग यमन..!

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

कित्ती कित्ती छान!

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 26/10/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात. झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला.

एम - २२

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 26/10/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

तुनळीवरील दत्तधाम चित्रफीती

लेखक शुचि यांनी रविवार, 24/10/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेल्या १५ चित्रफीतींमधून महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदि विविध राज्यातील दत्त धामांचे मनोहर, अतिशय सुंदर दर्शन घडते. सोला, नारेश्वर, पैठण, करंजा, गरूडेश्वर, शेगाव, अक्कलकोट, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, तळेगाव आदि ठीकाणच्या दत्त मंदीरांचे लोभस दर्शन या चित्रफीतींमधून घडते. संकलन आणि निवेदन उत्कृष्ट आहे. संगीत, नारेश्वरधून अतिशय कर्णमधुर आहे हे यांचे वैशिष्ट्य. गुजराथी भाषेत असल्या तरी समजण्यास अगदी सोप्या आहेत.

नव स्दस्य

लेखक pramanik यांनी शनिवार, 23/10/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रामाणीक आपटे, राहणारा पुणे,सध्या गुजरात संगणकतज्ञ मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक. मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव सं