Skip to main content

द स्मर्फ्स ( 3D ऍनिमेशनपट )

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 01/08/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी मुलांच्या 'ऑर्डर'ला मान देउन (हो, आजकालची मुले विनंती करत नाहीत) द स्मर्फ्स हा 3D ऍनिमेशनपट बघितला. तसे मला ऍनिमेशनपट भयंकर आवडतात.

मिपा कट्टा - ३० जुलै

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 01/08/2011 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले.

सिंघम - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी रविवार, 31/07/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो.

"चौफुला - २०११ काव्य जुने-शब्द नवे" अहवाल

लेखक प्राजु यांनी रविवार, 31/07/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील द्वैवार्षिक अधिवेशनात 'चौफुला - २०११ काव्य जुने - शब्द नवे' हा मराठी कवितांचा कार्यक्रम दि २३ जुलै २०११ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात अमेरिका आणि कॅनडा येथील १२ प्रथितयश कवी-कवयित्रींनी आपल्या सर्वोत्कृष्ठ अशा प्रत्येकी २ कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष्या सौ माधुरी जोशी यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली.

रेव्ह पार्टी तोडल्यावर...

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 30/07/2011 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री पुण्याजवळ्च एका विवक्षित ठिकाणी एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, काही विशिष्ट आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करुन केलेल्या या आयोजनाची खबर काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर लगेच ती पार्टी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी काही अतिविशिष्ट कायदा सुव्यवस्था अंमलबजावणी गटांची मदत घेण्यात आली त्याचा हा रिपोर्ट. पहिले काही फोटो, रेव्ह पार्टीच्या स्थळावर कॅमेरा बॅगेत लपवुन काढलेले आहेत.

ए दिल ए नादान..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 30/07/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हातरी अचानक एखाद्या गाण्याची आठवण होते आणि मग ते गाणं इंटरनेटवर शोधून ऐकावंसं वाटतं. आताच्या हायटेक जमान्यात हे करणं सहज शक्यही आहे. त्या गाण्याला ऐकण्याच्या मोहात आपण यूट्यूब, धिंगाणा अशी एखादी साइट उघडतो आणि ते गाणं वाजू लागतं. आपल्याही नकळत आपण त्या गाण्याच्या आधीन होऊन जातो आणि ब्रम्हानंदी टाळी का काय म्हणतात ते होतं. ए-दिल-ए -नादान.. हे गाणं पहिल्यांदा केव्हा कानावर पडलं आत्ता आठवतही नाही मला. पण या गाण्याची गहराई जेव्हा पहिल्यांदा जाणवली तो प्रसंग मी विसरूच शकणार नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी....तेव्हा मी कॉलेजला होते आणि मी आणि काही मैत्रीणी कुठूनतरी येत होतो. बहुतेक पुण्याहूनच.

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/07/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात.

ब्राऊ...५

लेखक गवि यांनी मंगळवार, 26/07/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
3