कविता - आस्वाद
"कविता" हा माझा जीव की प्राण असा साहीत्यप्रकार आहे.
कवितांमध्ये असलेली भावना चेतविण्याची क्षमता हाच पैलू नाही तर थोड्या शब्दांत खूप काही मांडण्याची आणि मनावर शाश्वत छाप सोडण्याची क्षमता हे कवितेचे अन्य पैलूदेखील अतिशय आकर्षक आहेत. अतिशय अर्थवाही असा हा साहीत्यप्रकार आपल्याला तर बुवा खूप आवडतो याचा अर्थ कळतोच असे नाही. वेड मात्र जबरदस्त आहे.
मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे.
मिसळपाव
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.