Skip to main content

चित्रचक्कर क्रमांक १ ते २३

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 10/08/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे.

माधव, माधवी, आणि मंदी

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 09/08/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं माधवी, हे काय? तू चक्क आम्रखंड आणलयंस आणि ते ही चितळेंच? तुला माहिती आहे नं काय चाललंय ते?" "अरे असं काय करतो, माधव? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग काही गोड-धोड नको का जेवणात?" "ही काय गोड खाऊन सेलिब्रेट करण्यासारखी घटना आहे का?" "काय???" "नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की फक्त गोड-धोड खाऊनच आनंद सेलिब्रेट करता येतो का? आपलं एकमेकांवरचं वाढत जाणारं प्रेम काय कमी गोड आहे? त्या तरल, रोमँटीक, गुलाबी भावबंधनाच्या गोडव्यापुढे आम्रखंडाचा गोडवा किती फिका वाटतो हे तुला सांगायची गरज आहे का?" "अरे हो पण थोडं गोड आणलं बाजारातून तर काय बिघडलं?

कानसेन कोण? २०११ - २

लेखक प्रभो यांनी सोमवार, 08/08/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. डिस्क्लेमर १. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत.

लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

लेखक प्रदीप यांनी रविवार, 07/08/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे. अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे.

ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता

लेखक शुचि यांनी शनिवार, 06/08/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे. रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो. त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते.

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

हानाबी (花火)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/08/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी 'कांजी' हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात. हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ - आगीची फुले.

ब्राऊ..६

लेखक गवि यांनी मंगळवार, 02/08/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
3