वाचणार्याची रोजनिशी
सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते.
अप्रतिम हैद्राबाद !
गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत.
हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते.
यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे.
मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं १ - ती आणि ते
या प्रतिसादात गणेशा यांनी एक सूचना केली होती. ती म्हणजे कवितांचं रसग्रहण करायचं असेल तर मिपावरच्याच एखाद्या नव्या कवीच्या चांगल्या कवितेचं रसग्रहण का करू नये? त्यायोगे कवीला व एकंदरीत सर्वच सदस्यांना आपलेपणा वाटेल. ही सूचना मला मनापासून आवडली. आपण कायम मराठी वाङमयात गाजलेल्या कवितांकडे लक्ष पुरवतो, त्यांचे गोडवे गातो. पण मिपावरदेखील अनेक कविता येतात. त्यातल्या काही आवडलेल्या कविता घेऊन रसग्रहण व चर्चा करायला काय हरकत आहे?
'शांताराम' नावाचे गारूड !
"I was a revolutionary who lost his ideals in heroin,
a philosopher who lost his integrity in crime,
and a poet who lost his soul in a maximum security prison."
-Lin.
कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा एक असा निकष असतो की ते वाचून संपवल्यावर तुम्हाला कुठेतरी थकवा जाणवला पाहिजे. तुमच्यातून अचानक काहीतरी कमी झाल्याचे रितेपण जाणवले पाहिजे.
पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान.
श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
तुझा झगा गं वार्यावर उडतो...
"हे मात्र अती होतंय आता. अरे तुमची आवड उच्च अभिरुची आणि आमची आवड उकिरडे हुंगणे. बास नाही सहन होत आता".
दिप्या अगदी तावातावाने बोलत होता. पण तो नेमका कुठल्या विषयावर बोलत होता त्याचा मला बिलकुल अंदाज येत नव्हता. दिप्या माझा शाळेतला, ज्युनियर कॉलेजमधला जिगरी मित्र. बारावीनंतर मी इंजिनीयरींगला गेलो आणि हा बीएस्सीला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी शेवटच्या वर्षाला असताना आमच्याच गावातील माझ्या कॉलेजला आणि माझ्याच डीपार्टमेंटला लॅब असिस्टंट म्हणून आला. मग तर आमची मैत्री अगदी मोगर्यासारखी बहरली. आम्ही जगातल्या यच्चयावत विषयांवर सांगोपांग चर्चा करु लागलो. पुढे वर्षभराने माझी डीग्री संपली.
पराठे वाला कट्टा
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस.
व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री.
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" आणि "चांदोबा"
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.
मिसळपाव
