Skip to main content

ओशो भाष्य " कबीर बाणी"

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 12/07/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
जही घट प्रीती न प्रेमरस , पुनि रसना नहि राम ते नर इस संसार मे, उपजि भये बेकाम || " नेहमी शोधत राहायचे की आपल्या हॄदयामध्ये प्रेमरस ओत्तप्रोत भरलेला आहे की नाही आणि समजा भरलेला नसेल, आणि लक्षात आले की आतमध्ये वाळवंट आहे, तेथे पाउस पडणार नाही. तेव्हा त्वरा करा, अहंकार बाजूला करण्याची..!! तेच ध्यान आहे , हीच प्रार्थना आहे! अहंकाराला बाजूला सारण्याची कला म्हणजे योग , तोच खरा धर्म...!! अहंकार आणि विचार सोडले तर तुमच्या हृदयात प्रेमरस भरू लागेल. बाहेर पाउस बरसतच असतो..

मागे ती लुगडी

लेखक शरद यांनी शनिवार, 09/07/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ती लुगडी एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध. मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही.

हानामी (花見) : साकुरा

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 02/07/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
हानामी (花見) : साकुरा हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ. वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते.

टीव्हीतली दुनिया

लेखक प्रास यांनी शनिवार, 02/07/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा. या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे.

इगतपुरीचा पाऊस

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शुक्रवार, 01/07/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा. पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा. सर्वांगात मुरणारा पाउस. घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. वार्‍यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी. त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे. बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात लोकांपुढे आले आ

रागांचा महासागर आता एका क्लिकवर

लेखक यकु यांनी गुरुवार, 30/06/2011 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बाराशे रागांचा डेटाबेस आणि सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध करून देणारी 'ओशन ऑफ रागाज्' ही वेबसाइट म्हणजे संगीतप्रेमींसाठी तसेच अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. यामुळे भारतीय संगीतातील सगळी घराणी जवळ आली आहेत. त्याविषयी... [ सौजन्यः म. टा. ] टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झालेले गदे यांचा हा वैयक्तिक संग्रह वेबसाइटवर आल्यामुळे आता सर्वांसाठी खुला झाला आहे. आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रहाचे रुपांतर 'ओशन ऑफ रागाज्' मध्ये करण्यासाठी त्यांना दीड वर्ष लागलं.

रागिणी MMS

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 30/06/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.