Skip to main content

डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 16/09/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्‍यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही. "Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्‍या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं.

पॉप टेट्स..

लेखक गवि यांनी सोमवार, 12/09/2011 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
पॉप टेट्स ही व्यक्ती म्हणजे माझ्या माहितीनुसार "आर्चीस" कॉमिक्समधल्या पोरापोरींच्या टोळक्याचा अड्डा असलेलं जे आवडतं रेस्टॉरंट असतं त्याचा मालक. "जगहेड" हे त्याचं बर्‍यापैकी खाबू गिर्‍हाईक. बस्स. पॉप टेट्सविषयी इतकी माहिती मला मिळाली आहे. पण हे नाव धारण करुन मुंबईत खूप ठिकाणी पॉप टेट्स "अनरेस्टॉरंट्स"ची मालिका उभी राहात आहे. मिपावर खादाडीच्या ठिकाणांविषयी शेकडो धागे आलेले आहेत. त्यातले अनेक धागे आणि त्यांच्यावर आलेल्या प्रतिक्रिया या गावोगावच्या मिसळीच्या टपर्‍या, वडापाव अशा रोडसाईड चविट्ट पदार्थांपासून ते उत्तमोत्तम हाटेलांपर्यंत सर्वकाही वर्णन करुन सांगणार्‍या आहेत.

'सायलेन्स प्लीज'...थँक यू...

लेखक प्रभो यांनी सोमवार, 12/09/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता. मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले.

कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 06/09/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे. कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती. कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात.

मुसळधार पावसात-लोहगडावर

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 05/09/2011 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा पराठेवाला कट्टा यथासांग पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवसाचा रविवार तसा आळसातच घालवायच्या तयारीत होतो. तितक्यात सकाळी ९.३० ला मित्राचा फोन आला "१०.३० पर्यंत तयार हो, बाहेर जायचेय भटकायला". कुठे जायचेय, कसे जायचेय काहीही ठरले नव्हते. ठरल्याप्रमाणे तो वेळेवर आला, गाडीत बसलो आणि कुठे जायचे याची चर्चा सुरु झाली. मुळशी, पवना वगैरे ठिकाणांचा विचार मागे मागे पडत गेला. पाऊस तर मुसळधार पडत होता आणि विचार फक्त भिजण्याचाच होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गानेच प्रवास चालू होता. डोंगर अगदी हिरवेकंच झाले होते. ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत होते.

ब्राऊ ..८

लेखक गवि यांनी सोमवार, 05/09/2011 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
3

Fast Five

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 05/09/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. The Fast and the Furious सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची.