लेखकभक्तियांनी शुक्रवार, 14/10/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ...
लेखकछोटा डॉनयांनी गुरुवार, 13/10/2011 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही.
लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत.
लेखकप्रासयांनी मंगळवार, 11/10/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय.
कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.
लेखककौन्तेययांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.
लेखकविसोबा खेचरयांनी सोमवार, 10/10/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.
जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न.
लेखकगवियांनी सोमवार, 10/10/2011 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.
नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी..
काय?.. सांगतो..
सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या.
तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच.