Skip to main content

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/05/2012 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

गोष्ट एका अंगठीची

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 23/05/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या दारासमोर पायरीवर रामा एकटाच विमनस्क अवस्थेत बसलेला होता. गेले दोन दिवस लोकांचे प्रश्न ऐकून ऐकून बिचार्‍याचा जीव कावला होता. 'कमळी कुठं गेली रे? ' 'रामा, तिला कुणी पळवलं तर नसेल? ' 'तिचं कुणासंगट लफडं होतं का रे?' 'गावात सगळीकडं शोधलं म्हंतोस, खरं गावातल्या पडक्या हिरीत बघितलास काय रे?' एकेकाचा एकेक प्रश्न. आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बिचार्‍या रामाकडे नव्हतं. 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हणतात खरं, पण अशा वेळेला लोकांच्या तोंडून परमेश्वर नव्हे सैतान बडबडत असतो, याचा पुरेपूर अनुभव रामा दोन दिवस घेत होता. शब्द वेगळे, प्रश्न वेगळे परंतु सगळ्यांचा अर्थ एकच होता- कमळी गायब आहे.