Skip to main content

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

तुकाराम... हे राम !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/06/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता.

या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 10/06/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील..... ही कल्पना खरोखर फारच छान आहे. खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 08/06/2012 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 08/06/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

गीत -संगीत- पाऊस पाऊस

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 07/06/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाच्या झळा धरतीला, आसमंताला अन आपल्याला सर्वाना नकोनकोसे करून सोडतात. " ओहोट कधी घे‍ईल हा तीव्र उन्हाळा दे‍ईल कधी पाणकळा सुख जिवाला " अशी तगमग मग लागून रहाते. देवाजीने करुणा केली अशी आकाशातील बापाची मग कृपा होते व मग नभ मेघानी आक्रमिले तारांगण सर्वही व्यापुनी आले असा साक्षात्कार अस्मानातून चहूबाजूनी होउ लागतो. मग कवि लिहून जातात " भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे...