Skip to main content

रावडी राठोड

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 07/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे.

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

जगज्जेता विशी!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/06/2012 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!

वेगळे आवाज

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 30/05/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'. तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते.