Skip to main content

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 21/06/2012 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

फारीनचे जोक

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 19/06/2012 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी लोकांचे जोक आणि त्यांची विनोदी हाडे (फनी बोन्स) शेयर करूयात... मिपावर हा धागा आधीच अवतरला असेल तर काढून टाकावा ... माजं कान्ट्रिब्युसन ... ******** जपानी डॉक्टरचे मराठी नाव ... टोचु-का-सुई चिनी कुत्राचं नाव ... हे-हुंग्-ते-हुंग. टांझानियन माणसाने गिरगावात स्विमिंग पूल उघडला त्याचे नाव ... या डुंबा डुंबा त्या स्विमिंग पूलचा रखवालदार रशियन असेल तर त्याचे आडनाव ... उभा-का-बस्की ******* म्हणतात स्वर्ग तिथे असतो जिथे .... तुम्हाला अमेरीकन पगार असतो तुम्हाला चायनिज जेवण मिळतं तुमचं ब्रिटिश घर असतं आणि तुमची बायको भारतीय असते. पण नरक तिथे असतो जिथे ...

मृत्युघंटा

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 19/06/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शह देण्यासाठी लांडग्याला झालेली कोल्हयांची युती शेपटाच्या लांब्या कमी पडल्या म्हणुन कापसाचे पुंजके टिंबाला जोडुन दाखवले तरसाने केलेली लांडग्याशी युती आणि हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा सहनही होत नाही सांगता येत नाही हत्ती डुलतोय मांस खावुन लांडगा मेला तर हत्तीचा घोडा लांब जायचे तर घोडाच बरा पण हत्ती असणं म्हणे भाग्याचे लक्षण छापकाटा करुन कुत्रे ठरवतील तरसाला मारायचे की स्वतः मरायचे काहीही असो जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे होवुन जावु द्या खांडववना प्रमाणे अग्नीतांडव कदाचित इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर

अटरली बटरली.....

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 17/06/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
अटरली बटरली..... मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-) जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'! काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.

गोवा रंगीला रे...

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 14/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट - 'बिग फिश'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 14/06/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी जीवनशाळेमधला सर्वात जास्त कठीण विषय कोणता असेल तर तो आहे नात्यांचं व्यवस्थापन. कदाचित मी जे काही लिहितोय ते सगळं कुणाला पटेल की नाही याची मला कल्पना नाही पण मला स्वतःलाही, आपल्याला नात्यांचं योग्य व्यवस्थापन करता आलंय की नाही याची शंका सतत भेडसावत राहते. मूळात एकत्र कुटुंबात वाढलेल्याला नाती आणि त्यांच्या व्यवस्थापनामधलं ज्ञान मिळण्याची सोय घरातच मिळालेली असते. विभक्त कुटुंबामध्ये मात्र अशी परिस्थिती नसते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गोष्टी-वेल्हाळ असेल तर त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातल्या गोष्टींमधून त्याला ओळखण्याची वेळ आपल्यावर येते.

मेहदी हसन यांना श्रद्धांजली!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 13/06/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली! या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा! माझ्याकडून हे... सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ***

शांघाय

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 13/06/2012 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की.