Skip to main content

सुन री पवन

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 08/02/2013 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI 'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा. गाण्याची सुरवात होते तेंव्हा, प्रथम एक पामेरियन कुत्रे बीचवर धावताना दिसते. एक गुब्बु मुलगा बीचवर बॉल खेळताना दिसतो न दिसतो तोच, मौशुमी वाळूचे घर बांधताना दिसते. निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते.

युं हसरतोंके दाग

लेखक शरद यांनी शुक्रवार, 08/02/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
यू हसतोंके दाग जुन्या चित्रपटांची आठवण झाली की कॉलेजमधील मैत्रीणींचीही होते. बरेच साम्य होते. त्या वयांत बर्‍याच जणी चित्रपटातील नायिकेंसारख्या दिसतात असे वाटावयाचे. आज भेटल्या कीं पुलंसारखे :अगा उज्जैनी.." म्हणावे लागते ही गोष्ट अलाहिदा. हा वयाचा परिणाम म्हणून सोडून देऊं. तरीही इतरही साम्य काही कमी नाही. जुने चित्रपट का आठवतात ? एखादा चित्रपट त्याच्या कथानकामुळे लक्षात रहातो, एखादा त्यातील अभिनयामुळे, एखादा उत्तम सेट्टिन्ग्ज/लोकेशन्समुळे, तर एखादा संगीतामुळे.

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

स्वामिनी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 01/02/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं. तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग २

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 31/01/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
इथे भाग १ वाचावा आपण पहिल्या लेखांकात पाहिले आहे की राग एक मसाला असेल तर पदार्थ म्हणजे काय बुवा ? ते आता जरा पाहू. राग हा गोडवा निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. असाच पदार्थ चविष्ट करण्याचा " राजमार्ग" मसाला उत्पादकानी शोधून काढला आहे. असो. तर मी काय म्हणत होतो तर पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे " ख्याल" आणि उपशास्त्रीय प्रकार. त्याअगोदर जरा स्वर या संकल्पनेची माहिती घेउ. मानव वंश विकसित होत असताना मानवाने २० ते २०००० हर्टझ या आवाक्यातील निरनिराळ्या ध्वनिलहरी ऐकून घेतल्या.

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

लेखक अक्षया यांनी मंगळवार, 29/01/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले. हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते.