एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!
संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावभर भटकून मावळल्यावर मी घराकडे कूच केली. अरुंद जिन्यातून वर माझ्या रूमकडे जाताना आजूबाजुला दिसनार्या सरपटणार्या प्राण्यांवर एक बारीक नजर होतीच. इथे आल्यापासून जीने माझे जिने हराम केले होते ती जिन्याच्या डाव्या भिंतीवर फतकल मारून बसलेली (की झोपलेली) होतीच. तिला चुकवून उजव्या बाजूने सटकलो. कुलुप उघडून आत रूममध्ये शिरलो. रूम म्हणजे एक भलीमोठी खोली आणि तिला जोडूनच एक बाथरूम. माझ्या घरासमोरचे आंगण म्हणजेच घरमालकाचे टेरेस, या हिशोबाने हवे तर आपण त्याला टेरेस फ्लॅटही बोलू शकतो. रूमच्या पुर्वेला एक खिडकी होती जी रात्रीची मी कायम बंदच ठेवायचो.
मिसळपाव
***