Skip to main content

वेढा

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 12/09/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंकिता. . . . . . .

सुप्रभात!

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 11/09/2020 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात सध्या २ आठवडे झाले सकाळी सकाळी उठून सायकल चालवायला जातेय. थंडीची चाहूल लागतेय पण पाऊस अजून पूर्ण गेला नाहीये असं काहीस वातावरण आहे. संध्याकाळहून आकाश भरून येत आणि धो धो पाऊस पडून जातो. पण सकाळी अगदी मस्त मोकळं आकाश असतं. पहाटे खरं तर उठायचा कंटाळा येतो पण आताशा बाहेर गेल्यावरच वातावरण बघायची, अनुभवायची सवय झालेय त्यामुळे हल्ली कमी कंटाळा येतो . ६.३० च्या दरम्यान मी बाहेर पडते तेव्हा सूर्य उगवलेला नसतो पण स्पष्ट दिसायला लागलेलं असतं. हलके हलके धुकं पडायला सुरवात झालेली असते. वातावरण एकदम प्रसन्न असतं.

शिक्षक दिन

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 09/09/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.

कथा एअरकंडिशनिंगची ः एका अनुभवाचा सारांश

लेखक केदार पाटणकर यांनी मंगळवार, 08/09/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका ठिकाणी ग्रंथालय व माहिती केंद्रात काम करीत होतो. तेथे असलेल्या वातानुकूलन यंत्र बिघडलेले होते. थोड्या दुरुस्तीनंतर ते यंत्र पुन्हा सुरु होत असे व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. नव्या यंत्राची निकड होती. नवीन यंत्र घ्यावे किंवा केंद्राची पूर्ण खोलीच वातानुकूलित करावी असे दोन पर्याय समोर येत होते. मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख माझे साहेब होते. त्यांना आपण अ म्हणू या. त्यांच्यासमोर विषय मांडला. त्यांनी तो वीज व ऊर्जा विभागाच्या प्रमुखांना पाठवला. या प्रमुखांनी सांगितले की, संपूर्ण जागा वातानुकूलित करणे खर्चिक आहे. त्यापेक्षा आकाराने लहान असलेला एक हॉल बांधू.

झाड आहे साक्षीला

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 05/09/2020 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत.

सुंदरा मनामध्ये भरली

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 03/09/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुपरमार्केटमध्ये जायचं म्हणून अगदी निगुतीनं यादी करावी आणि येताना यादीत नसलेले दोनचार जिन्नस तरी अधिक घेऊन घरी यावं तसं माझं शिकवताना होतं. मनातल्या मनात आज काय शिकवायचं याचं कितीही नियोजन केलं तरीही बायोलाॅजीबरोबर कधी फिलाॅसाॅफी, कधी सोशोलाॅजी तर कधी सायकोलाॅजीला हात लावून यावं हे ठरलेलं. त्या दिवशीही तसंच झालं. बारावी सायन्सवर माझं लेक्चर होतं. Sex determination in different individuals हा टाॅपिक होता. त्याआधीचा बराचसा भाग केवळ माहितीवर आधारित (descriptive) असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचे थोडेसे कंटाळलेले भाव जाणवत होते.

आली आली गौराई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/08/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

चुका

लेखक rushikapse165 यांनी गुरुवार, 20/08/2020 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्‍यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो. सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती

अव्यक्त स्पंदने

लेखक तेजल दळवी यांनी बुधवार, 19/08/2020 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..