Skip to main content

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 28/11/2020 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी बुधवार, 11/11/2020 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद

मनाचिये गुंती

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 09/11/2020 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग. आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे. ४ मनाचिये गुंती.. गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात गेलो.एंजिओप्लास्टी होऊन,सहा दिवसांनी ,महालक्ष्मीचे शेवटचे दिवशी, घरी परतलो.     माझी जीवनशैली ,प्रकृती ,सवयी इ.लक्षात घेता मला हार्ट एटॅक  यावा हा मलाच नाही तर मला ओळखणारे सर्वांसाठी धक्काच.अगदी शिस्तबद्ध  नसलो तरी मी बेशिस्त ही नाही.

जिंदगी ख्वाब है.

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 09/11/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
३.    जिंदगी ख्वाब है.. डोळे उघडले.कुठे होतो हे सुरुवातीला काही कळलेच नाही.  नवीन जागा होती. दोन्ही हातांना सुया टोचलेल्या.त्यांना जोडलेल्या नळ्या तून सलाईन वाटे औषधे सुरू होती.छातीवर पण काही नळ्या होत्या.एका यंत्राला जोडलेल्या. नाकाला ऑक्सीजन मास्क. कॅथेड्रल,डायपर पण  लावलेले.  मग लक्षात आले. हॉस्पिटलमधील  आय.सी.यु.वॉर्ड. बेडवर होतो.. 'कसं वाटतंय आता? ठीक आहात?'_नीलू. 'हो.

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 08/11/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

देवाचिये द्वारी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 08/11/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला ह्दयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली त्या अनुभवाविषयी लिहिले आहे चार भागात. त्यापैकी दुसरा भाग : २ देवाचिये द्वारी. "त्याचे" घर हेच  शेवटचे विश्रांती स्थान असते सर्वांचे,असे म्हणतात. शेवटी तिथेच जायचे आहे. सर्वांनाच.अपवाद नाहीच.फक्त कोण ,कधी, कसा ,तिथे पोहचणार?हे मात्र इकडच्या कुणाला कधीच ठाऊक नसते. आणि तिथे जायला कुणीही कधीच तयार ही नसतो. भितीच वाटत असते जाण्याची.त्या कल्पनेचीही.आपण कायम इथेच राहणार आहोत हेच गृहीत धरून असतात सगळे .आपण या जगात येतो,तेव्हाच  श्वासांची संख्या ठरलेली असते म्हणे. ती संपली की सारेच संपले.आपले इथले अस्तित्व ही.

आपुले मरण पाहिले म्या..

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 07/11/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली. त्या अनुभवाविषयी लिहिले आहे. चार भागात पैकी हा पहिला . आपुले मरण. २२ऑगस्ट २०२०. सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली,माहित नाही. १६\१७ ऑगस्ट २०२०ची रात्र असावी. छातीत उजव्या बाजूला अगदी वर ,गळ्याचे खाली भरून आल्यासारखे जाणवले. थोडे दाबल्यावर बरे वाटले. नंतर रोज रात्री कमी जास्त प्रमाणात तोच प्रकार. पाठ  दंड हात चोळून घेतले की ठीक व्हायचे .दिवसा मात्र काही नाही. ॲसिडिटी  होते अधूनमधून. अस्थमा ही आहे.गॅसेसचा त्रास आहे.त्यामूळे किंवा वातविकाराने होत असावे हा समज झाला.

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/11/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले.