Skip to main content

दोन अनोखे कोर्ट मार्शल

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.

दोन अनोखे कोर्ट मार्शल

एअरफोर्समध्ये कोर्टमार्शल होणं हे एक अतिशय लज्जास्पद प्रकार म्हणून मानला जातो. पूर्वीच्या काळी आर्मीमध्ये विशेषतः कॅशिरिंग अशी एक पनिशमेंट होती. कॅशिरिंग म्हणजे अक्च्युअली तुम्ही फिल्डमध्ये ऐनवेळी साहस दाखवायला कचरता किंवा तुमची ब्रेव्हरी किंवा तुमचा काय तो धाडसीपणा दाखवत नाही किंवा काही काही वेळेला अतिधाडसीपणा करून दाखवता की जो त्या कामाकरता उपयोगी नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॅशियर्ड केलं जातं. त्याच्या अंगावरची रँक बॅजेस काढून त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं जातं आणि त्याचं पेन्शन वगैरे तेही बंद होते.

आवाज की दुनिया का दोस्त

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 26/10/2020 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
'आवाज की दुनिया का दोस्त।' दोन हजार आठ मधे मुंबई ला जॉईंट च्यारिटी कमिशनर (धर्मादाय सह आयुक्त) होतो। विविध प्रकारचे ,विविध स्तरातील लोक कामानिमित्त भेटायचे । एके सकाळी निजी कक्षातला फोन वाजला। सहाय्यका ने घेतला । कुणीतरी माझ्या भेटीची वेळ मागत होते । "आज साहेब बिझी आहेत " सरकारी नोकरांची ही एक पध्दत असते, आपले महत्त्व वाढविण्यासाठी। त्यानुसार त्याचे उत्तर । नजरेनेच , 'कोण? 'म्हणून माझी विचारणा। अमीन सयानी ,ते रेडीओ वाले '- सहाय्यक। क्षणभर काही कळलेच नाही। अमीन सयानी ? द लेजैंड ?

गावाकडचे नवरात्र

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 25/10/2020 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन नवरात्र गावातील मोठ्या  चौकात,मध्यभागी एक मोठा आड. चौकाभोवती  देशमुखांची पंधरा सोळा घरे. देशमुख गल्ली. दोन मोठी चिरेबंदी वाडे . पैकी एक आमचा.  भाद्रपद वद्य ( पितृपक्ष) संपायच्या आधी चार पाच दिवस  ,म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या साफसफाईची लगबग  .    ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण. स्त्री  मजुरांकडून. अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी. अंबाडीचे कुंच्याने  किंवा पिकांवर, डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने. बैठकीचे भिंतींना खालचे अर्ध्या भागास निळा/हिरवा ऑईलपेंट. वरती  डिस्टेंपर.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 21/10/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

प्लास्टिकच घर

लेखक Prajakta Sarwade यांनी शनिवार, 10/10/2020 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरापलीकडे एक भलमोठ नवीन तीन मजली घर बांधला आहे. तिथे एक परिवार राहयला आल आहे. बाहेरुन तर एकदम मस्त दिसत घर,अचुक रंगसंगतीने रंगवल आहे.अंगणात सुरेख छोटीशी बाग आहे. त्या बागेत मोगरा, गुलाब, जाई, रातराणी, जास्वंद,अनेक फुलाची झाडं आहे. मधल्या मजल्यावर छोटीशी Gallery आहे तिथे कुंडीत रोपे लावलेली आणि त्या कुंड्या लटकवल्या. हवेच्या तालात त्या सुरात हालत असत. फाटकाच्या आत नेहमी एक महागडी कार उभी असते. त्यांच्याकडे एक कुत्रा ही आहे. एकंदरीत खुप श्रींमत लोक राहयला आलेत. नुस्त बाहेरुनच इतकं सुंदर घर तर मग आतुन किती सुंदर असेल.मला ते घर आतुन पण बघायची तीव्र इच्छा झाली.

एका नातवाची आजी....

लेखक Vivekraje यांनी शुक्रवार, 02/10/2020 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं. असंच त्या दिवशी माझी रोजची साडेसातची बस चुकली अन मी साडेआठच्या बस मध्ये बसलो. बस गच्च भरलेली घामाचा कोंदट वास , उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे हवेतही उष्णता जाणवत होती. बस सुटायला थोडावेळ बाकी असताना एक आजी बसमध्ये शिरली, हातात छोटंसं गाठोडं , एक नायलॉनची पिशवी.

आठवणी १ - प्रस्तावना

लेखक मनस्विता यांनी सोमवार, 28/09/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच मिसळपावने गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही. माझ्या बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्हाला वेगवेगळ्या गावांत राहायला मिळाले. त्यामुळे लिहायला सुरु केलं तेव्हा आमचा तो प्रवास टिपावा असा विचार केला.

जमतारा (की जामतारा) पॅटर्न : कॅशबॅकच्या नावाखाली लुटीचा नविन प्रकार

लेखक सॅनफ्लॉवर्स यांनी मंगळवार, 22/09/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(बरेच वर्ष मिसळपावचा सभासद आहे पण लिहिण्याचा योग आज आला. काही शुद्धलेखण्याच्या चुका असतील तर जरून सांगा. मी हे लेखन गूगल इनपुट टूल वापरून केलेलं आहे जे मला खूपच सोपं वाटत. पण नंतर गमभन टंकलिपी वापरुन पाहिली, तीपण सोपी आहे वापरायला, त्यामुळे यानंतरच लेखन तेच वापरुन करेन. ) आजचा (18 सप्टेंबर 2020) माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला अज्ञात क्रमांकावरून फोन आला की तो मुंबईतील फोनपे मुख्य कार्यालयातून कॉल करीत आहे आणि मला काही फोनपे कॅशबॅक मिळाली आहे पण त्यासाठी त्याला माझ्याकडून काही माहिती हवी आहे. भाषा खूप सभ्य होती परंतु इंग्रजी खूपच खराब होती.

Once in a lifetime....!

लेखक डॉ श्रीहास यांनी शनिवार, 12/09/2020 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...